सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; PA खासदारांना फोन लावून द्यायचे अन्…; भावाचे खळबळजनक दावे

Phaltan Doctor Killed Herself फलटणमध्ये महिला डॉक्टरने जीवन संपवल्याची घटना घडली. त्यानंतर या डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत.

Phaltan Doctor Killed Herself

Satara Phaltan Sub District Hospital Doctor Sampada Munde Killed Herself Serious Allegations Against MP : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये या मृत महिला डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये खासदाराचे पीए तिच्यावर दबाव टाकत होते. त्यांनी खासदारांना फोन लावून दिला असता त्यांनी देखील तिच्याशी बोलने केले होते. असा आरोप केला आहे.

अक्षया नाईकच बॉलिवुडमध्ये पदार्पण ! ग्रेटर कलेश फॅमिली ड्रामामधून करणार डेब्यू

दरम्यान यात संबंधित महिला डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadnavis) यांनी संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित पीएसआय बदनेचं तात्काळ निलंबन तर, बनकरच्या अटकेचे आदेश दिले आहेत.त्यानंतर आता थेट फलटण भागातील खासदारांचे नाव देखील यामध्ये या महिला डॉक्टरच्या भावाने केले आहे. त्यामुळे नाव न समोर आलेले हे खासदार कोण? अशा अनेक प्रश्नांना या प्रकरणाने तोंड फोडले आहे.

मृत महिला डॉक्टरच्या भावाचे खळबळजनक आरोप

या मृत महिला डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत की, या महिलेवर पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यासाठी खासदारांचे नाव माहिती नाही. मात्र त्याचे पीए तिच्या भेटीला आले होते. त्यांच्याकडून दबाव टाकला जात होता. त्यांनी खासदारांना फोन लावून तिच्याशी बोलणं देखील करून दिलं होतं. हे खासदार फलटण भागातील आहेत. तिने या प्रकरणी 2-3 महिन्यांपूर्वीच तक्रार दिली होती. वरिष्ठांना देखील याबाबत माहिती देत आपल्यावर जीवन संपवण्याची वेळ येऊ शकते. असं सांगितलं होतं, पण त्याची दखल घेतली गेली नाही. असा खळबळजनक आरोप या मृत महिला डॉक्टरच्या भावाने केला आहे.

हातावरील सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

गुरूवारी (दि.23) रात्री आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. महिलेने त्यांच्या हातावर आत्महत्या करण्याचे कारण तळहातावर लिहिले होते. ज्यात त्यांनी पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिल्याचे नमुद केले आहे. महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन ‘माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन’ असा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने, अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

संबंधित डॉक्टरची सुरू होती चौकशी

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात अडकल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीनंतर संबंधित महिला डॉक्टरची अंतर्गत चौकशी सुरू होती. यामुळे महिला डॉक्टर मनासिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊलं उचलल्याचे आता बोलले जात आहे.

माझ्यावर अन्याय…मी आत्महत्या करेल

या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन.” तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.

follow us