अक्षया नाईकच बॉलिवुडमध्ये पदार्पण ! ग्रेटर कलेश फॅमिली ड्रामामधून करणार डेब्यू

Akshaya Naik ने ग्रेटर कलेश " या चित्रपटातून अक्षयाने तिच ओटीटी पदार्पण केलं आहे. या खास चित्रपटात तिने दमदार काम केलं आहे.

Akshaya Naik

Akshaya Naik to make Bollywood debut! She will debut in the family drama Greater Kalesh : सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. उत्तम अभिनय, सोबतीला अनेक दर्जेदार फोटो शूट आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट मधून अक्षया कायम चर्चेत असलेली बघायला मिळते. नुकतंच अक्षयाच दमदार ओटीटी पदार्पण झालं असून टेलिव्हिजन पासून सुरू झालेला तिचा प्रवास नेटफ्लिक्स डेब्यू पर्यंत येऊन पोहचला आहे.

राजीनाम्यानंतर भाजपशी जवळीक, फाळके- शिंदे भेटीमागे नवे राजकीय समीकरण?

नेटफ्लिक्स वर नुकताच आलेला ” ग्रेटर कलेश ” या चित्रपटातून अक्षयाने तिच ओटीटी पदार्पण केलं आहे. या चित्रपटात तिने एक खास भूमिका केली असून ती खूप लक्षवेधी देखील ठरतेय. प्रत्येक कुटुंबात घडणाऱ्या फॅमिली ड्रामाच उत्तम उदाहरण असलेल्या या खास चित्रपटात तिने दमदार काम केलं आहे. अक्षयाने या चित्रपटात “पंखुरी” हे पात्र साकारल असून ग्रेटर कलेश हा चित्रपट जगभरात नेटफ्लिक्स वर नंबर १ वर ट्रेंड होताना दिसतोय. कोणत्याही कलाकाराची बॉलिवूड मध्ये एकदा तरी काम करण्याची इच्छा ही असतेच आणि या निमित्तानं अक्षया या खास प्रोजेक्ट चा भाग झाली आणि तिचं बॉलिवुड पदार्पण सुपरहीट ठरलं आहे.

ब्रेकिंग! आता मच्छिमारांनाही मिळणार वीज सवलत; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…

पहिल्या वहिल्या ओटीटी डेब्यू बद्दल बोलताना अक्षया सांगते ” नेहमी एक पाऊल पुढे टाकायची इच्छा असते आणि माझ्यासाठी कुठलंच काम छोटं नसतं पण नेहमी नवीन काहीतरी करण्याची इच्छा असल्याने हा प्रोजेक्ट करण्याची मला संधी आली असं मला वाटतं. कुठल्याही कलाकारासाठी नेटफ्लिक्स हा प्लेटफॉर्म हे खूप मोठा आहे हे कायम वाटत आणि माझा पहिला बॉलिवूड फिल्म डेब्यू इकडे होईल याची कल्पना नव्हती. एवढ्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपट करायला मिळणं ही संधी खूप खास होती याचा तर आनंद आहे आणि अर्थातच आमची फिल्म सध्या no. १ वर ट्रेंड करत असल्यामुळे स्वतःलाच एक मस्त दिवाळी गिफ्ट मिळालं याचा आनंद वाटतोय. मी (Terribly Tiny Tales ) यांचा डिजिटल कंटेंट गेले अनेक वर्ष फॉलो करतेय आणि नेहमी त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती आणि या फिल्मच्या निमित्ताने ते देखील पूर्ण झालं. TTT आणि Netflix या दोन्ही गोष्टी मी मैनिफेस्ट (manifest ) केल्या होत्या त्या एकत्र आल्या आहेत. मी एकमेव अभिनेत्री होती जी त्यांच्यात नवीन होती. सगळे सहकलाकार एकमेकांना आधीपासून ओळखत होते त्यांनी बरेच प्रोजेक्ट्स एकत्र केले सुद्धा होते पण कुठल्याच क्षणी मला मी बाहेरची outsider अभिनेत्री आहे याची जाणीव करुन दिली नाही. माझी भूमिका जरी छोटं असलं तरी ती खूप महत्वपूर्ण आहे याचं संपूर्ण श्रेय मी आमचे दिग्दर्शक आदित्य Chandiok आणि लेखक रितू मागो यांना देईन. एका टिपिकल मराठी मुलीकडून त्यांनी एक टिपिकल दिल्ली गर्ल साकारून घेतली आहे. एहसास चन्नाच्या सोबत सगळेच इतर कलाकार खूप सुंदर काम करतात, आणि मुळात माणूस म्हणून देखील सगळे छान होते. चांगल्या प्रोजेक्ट मध्ये काम करताना जेव्हा चांगली माणसं भेटतात तेव्हा त्या प्रोजेक्ट च्या यशाचा आनंद हा शब्दात मांडता येत नाही“

आता इस्लामपूर नाही तर, ईश्वरपूर म्हणायचं; भुजबळांच्या नामकरण घोषणेला केंद्राची मंजुरी

अभिनयाची चुणूक दाखवून आज अक्षयाचा बॉलिवुड सिनेइंडस्ट्री मधला प्रवास जोरदार सुरू झाला असून येणाऱ्या काळात देखील ती बॉलिवुड सोबतीने मराठी प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असल्याचं कळतंय.

follow us