ब्रेकिंग! आता मच्छिमारांनाही मिळणार वीज सवलत; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…
आता मच्छिमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे वीज सवलत देण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे.
Fisherman : राज्यातील मच्छिमारांसाठी (Fisherman) राज्य सरकारकडून दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांनाही वीज सवलत मिळणार आहे. राज्याचे मस्त्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मागणीनंतर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता वीज सवलतीच्या प्रवर्गात राज्यातील मच्छिमारही येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा मच्छिमारांना मोठा फायदा होणार आहे.
आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कितीही कट कारस्थानं करा…, धंगेकरांचा जैन बोर्डिंग प्रकरणात मोठा दावा
मस्त्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आल्याने शेतकऱ्यांना ज्या प्रकारे वीज सवलत दिली जात होती. त्याप्रमाणेच आता मच्छिमारांनाही वीज सवलत मिळणार आहे. यामध्ये मच्छिमार, मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यावसायिक, मस्त्यकास्तकार यांना वीजेमध्ये शेतकऱ्यांसारखीच सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्याचा मस्त्य व्यवसाय प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी असणे बंधनकारक असणार आहे.
निलेश घायवळ प्रकरणात सर्वात मोठी बातमी! पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने केली ‘ही’ कारवाई
आधीचे वीजदर
मच्छिमारांसाठी राज्य सरकारकडून वीजेचे दराबाबत पत्रकच काढण्यात आलं आहे. यामध्ये लघुदाब, उच्चदाब, अतिउच्चदाब असे तीन वर्गवारी आहे. कृषी युनिटच्या प्रकारात लघुदाब वर्गवारीमध्ये 150 रुपये महिना तर वहन आकार 1.47 आणि वीज आकार 5.84 रुपये. तर उच्चदाब वर्गवारीत 115 रुपये महिना, वहन आकार 0.74 तर वीज आकार 8.32. तसेच अतिउच्चदाब वर्गवारीत 115 रुपये असून या वर्गवारीत वहन आकार लागू नसून वीज आकार 8.32 रुपये.
आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कितीही कट कारस्थानं करा…, धंगेकरांचा जैन बोर्डिंग प्रकरणात मोठा दावा
आत्ताचे वीजदर
मच्छिमारांसाठी आता नव्या वीजेच्या दरानुसार लघुदाब वर्गवारीत 60 रुपये महिना, वहन आकार 1.47, वीज आका 3.32 रुपये लागू असणार आहे. तर उच्चदाब वर्गवारीत 115 रुपये, वहन आकार 0.74, वीज आकार 5.97 असणार आहे. तसेच अतिउच्चदाब 115 रुपये महिना तर वहन आकार लागू नसणार आहे. तसेच वीज आकार 5.97 असणार आहे.
