Amit Shah यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बनला ६१० किलोचा विश्वविक्रमी मोतीचूर लाडू!
केंद्रीय गृहमंत्री Amit shah यांच्या वाढदिवसानिमित्त बनविण्यात आला विश्वविक्रमी ६१० किलोचा मोतीचूर लाडू

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एक अनोखा आणि गोड विक्रम घडला आहे.
६१० किलो वजनाचा भव्य मोतीचूर लाडू तयार करून विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (Winners Book of World Records) मध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे.
दिवाळीतच सोन्याला लागला उतार; चांदीचे निघाले दिवाळं, घसरणीचा 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत
हा लाडू प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रायकर फार्म, बाणेर (पुणे) येथे भक्तिभावाने तयार करण्यात आला. लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली सामग्री- १५० किलो बेसन, ३०० किलो साखर, १५० किलो तूप या सर्व घटकांच्या मिश्रणातून ध्यानधारणेच्या वातावरणात हा लाडू तयार करण्यात आला.
ब्रह्माकुमारी साधकांनी ईश्वरस्मरणात राहून लाडू तयार केला आणि तयार झाल्यानंतर त्यासमोर ध्यानधारणाही केली.
या विशेष लाडूचा प्रसाद पुण्यातील विविध अनाथाश्रम आणि सेवाभावी संस्थांमध्ये वाटला जाणार आहे. हा उपक्रम ‘आनंद आणि सेवेचा संगम’ म्हणून पाहिला जात आहे.तसेच या लाडूला Winners Book of World Records कडून अधिकृत मान्यता मिळाली. या वेळी या विक्रमाची घोषणा संस्थेच्या चेअरपर्सन, अभिनेत्री व मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी केली.
या विश्वविक्रमी लाडूचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. दरम्यान या प्रसंगी बी.के. डॉ. दीपक हरके (१८४ विश्वविक्रम धारक), बी.के. डॉ. त्रिवेणी (संचालिका, ब्रह्माकुमारी सेवा केंद्र, बाणेर), जालिंदर वाळके पाटील (संचालक, समृद्धी केटरर्स) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. दीपक हरके यांना आणि आयोजन टीमला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले.
हा उपक्रम केवळ विश्वविक्रमापुरता मर्यादित न राहता, श्रद्धा, ध्यान आणि सेवेचा संगम म्हणून ओळख मिळवत आहे. ईश्वरीय स्मरणातून बनवलेला हा लाडू समाजातील सकारात्मक विचार आणि प्रेमाचा संदेश देतो.