राजीनाम्यानंतर भाजपशी जवळीक, फाळके- शिंदे भेटीमागे नवे राजकीय समीकरण?
Rajendra Phalake यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राम शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय समीकरणं बदलू शकतात.
Closeness to BJP after resignation, new political equation behind Phalke-Shinde meeting : राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे माजी जिल्हाध्यक्ष व शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे राजेंद्र फाळके यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यानंतर लगेचच दिवाळी फराळाचं निमित्त साधत भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी फाळके यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांची चर्चा देखील झाली.
विशेष म्हणजे या भेटीत भाजपचे काही स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे राजकीय पातळीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, या भेटीचा परिणाम भविष्यातील राजकीय समीकरणांवर पडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. येणाऱ्या काळातील निवडणुका पूर्वी कोणती नवीन समीकरण जुळून येऊ शकतात याचा आपण आढावा घेऊ…
राजेंद्र फाळके यांच्याविषयी जाणून घेऊ
राजेंद्र फाळके हे सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिलेत. पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्षही होते. तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक सहकारी संस्था आणि तत्कालीन सहकारी साखर कारखान्याच्या पदांवर आणि राजकारणातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. फाळके यांनी 1984 पासून शरद पवार यांची साथ दिली. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली अजित पवार हे बाहेर पडले मात्र फाळके यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारत एकनिष्ठ राहणे पसंत केले.
‘गुम है किसी के प्यार में’ मधील किशोरीची ‘माना के हम यार नहीं’ मध्ये धमाकेदार एन्ट्री!
गेली अनेक वर्षे त्यांनी पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या देखील पार पाडल्या. तसेच नगर जिल्ह्यात लोकसभेच्या वेळी त्यांची भूमिका महत्वाची होती. यावेळी पक्षासाठी कामामध्ये झोकून देत दक्षिणेची जागा निवडून आणण्यामध्ये देखील त्यांचा मोठा सहभाग राहिला. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहे. दरम्यान शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे फाळके यांनी 15 ऑक्टोबरला कौटुंबिक कारणास्तव जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राजीनामा पत्रात त्यांनी कौटुंबिक कारण असल्याचे म्हटले आहे. मात्र असे असले, तरी त्यांचे आमदार रोहित पवार यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंधाची वादाची झालर असल्याची चर्चा आहे.
भारतीय मनोरंजनातला ऐतिहासिक क्षण; ‘क्योंकी सास भी कभी बहु थी 2’ मध्ये बिल गेट्स…
राजीनाम्यानंतर फाळके यांनी कोणताही खुलासा केला नाही किंबहुना त्यांनी मौन बाळगले आहे. दरम्यान राजीनाम्यांनंतर फाळके यांची पुढील राजकीय दिशा काय असणार आहे? याची उत्सुकता होती. असे असतानाच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी फाळके यांच्या निवासस्थानी भेट दिली. विशेष म्हणजे एकेकाळी दोन विधानसभा निवडणुकीत एकमेकांसमोर तगडे आव्हान निर्माण करणारे प्रा. राम शिंदे यांनी अचानक राजेंद्र फाळके यांच्या कर्जतच्या निवासस्थानी दिवाळी फराळनिमित्त सदिच्छा भेट दिली. यामुळे फाळके हे भाजपात प्रवेश करणार कि काय अशी चर्चा आता रंगली आहे.
शिंदेंचा डाव…रोहित पवार पुन्हा क्लीन बोल्ड
विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला. मात्र या पराभवाचा बदला घेण्याची एकही संधी शिंदे यांनी सोडली नाही. रोहित पवार यांच्या नेतृत्वात असलेली कर्जत नगरपंचायतवर शिंदे यांनी झेंडा फडकवला. त्यानंतर शिंदेंनी रोहित पवारांच्या अनेक शिलेदारांना आपल्याकडे खेचत त्यांना धोबीपछाड देत एकाकी पाडली होते. आता यातच भरत भर म्हणजे जिल्ह्याध्यक्ष राहिलेल्या फाळकें यांनी राजीनामा दिला व त्यांच्या भेटीस राम शिंदे पोहचले यामुळे येणाया काळात रोहित पवारांना खिंडीत गाठण्यासाठी शिंदे यांचा हा नवा डाव तर नाहीना अशी देखील चर्चा सुरु आहे.
