Jain Boarding Hostel : ‘तुम्ही उत्तर द्या’, ‘वेड लागलेला विकृत मनोवृत्तीचा माणूस’; धंगेकरांचे आरोप अन् मोहोळांचा संताप…

शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांवर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केलायं.

Murlidhar Mohol

Murlidhar Mohol On Ravindra Dhangekar : पुण्यातील जैन बोर्डिंग जमीनी खरेदी प्रकरणी शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात चांगलंच वाकयुद्ध जुंपल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोहोळ यांचे पार्टनर असलेले बढेकरांना आशिर्वाद देत त्यांनीच संगनमताने जैन बोर्डिंगची जमीन लाटली असल्याचा आरोप धंगेकरांकडून करण्यात आला. त्यानंतर महापौर असताना मोहोळ हे बढेकर यांच्या मालकीची असलेली इनोव्हा क्रिस्टा गाडी वापरत होते. यासंदर्भातील पोस्ट आणि फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या आरोपांनंतर आता मुरलीधर मोहोळही (Murlidhar Mohol) चांगलेच संतापल्याचे दिसून आले आहेत. एक वेड लागलेला विकृत मनोवृत्तीचा माणूस काहीतरी बडबड करत असल्याचं प्रत्युत्तर मोहोळ यांनी धंगेकरांना दिलंय. त्यामुळे आता पुण्यातल्या या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

नवीन वर्षात भरणार मराठी शाळा! ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ १ जानेवारी पासून चित्रपटगृहात

धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा फोटो शेअर करीत ही गाडी महापौर असताना मोहोळ वापरत होते असा दावा केलायं. त्यावर मोहोळ म्हणाले, मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत बढेकरांसोबत असलेल्या पार्टनरशिपचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये मी स्पष्ट लिहिलंय की बढेकर आमचे पार्टनर आहेत. आता पार्टनरशिपमधली मी माझी गाडी महापौर असताना वापरलेली आहे. पुण्यात पहिल्यांदाच महापौर स्वत:ची गाडी आणि स्वत:चं इंधन वापरत आहेत. माध्यमांनी ही निगेटिव्ह बातमी न करता पॉझिटिव्ह बातमी करावी, या शब्दांत मोहोळ यांनी धंगेकरांना प्रत्युत्तर दिलंय.

‘कांतारा: चॅप्टर 1’ या चित्रपटाची जोरदार चर्चा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली, जगभरात प्रदर्शित होणार

तसेच बढेकर यांच्या खाजगी गाडीवर महापौरांचा लोगो आहे. पुण्याच्या महापौरांची अस्मिता एका बिल्डरच्या दारात गहाण असेल तर पुणेकर सवाल उपस्थित करतील की नाही? असा थेट सवाल धंगेकरांनी केलायं. सकाळी उठलं की वैफल्यग्रस्त अन् निवडणुकीत पडले हे दोन वाक्य पुण्यात चांगलेच प्रचलित झालेत, पण तुम्ही निलेश घायवळ गुन्हेगारीवर बोला ना तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का? असाही सवाल धंगेकर यांनी केला आहे. त्यावरही मुरलीधर मोहोळ यांनी सडेतोड उत्तर दिलंय. तो बाबा खोटं काहीतरी ट्विट करतो तुम्ही रोज तिथं जाता त्याचं बातम्या तुम्ही चालवता. मी आत्तापर्यंत दोनवेळी स्पष्टीकरण दिलंय, आज शेवटचं देईल…एक वेड लागलेला विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतोयं..तुम्ही रोज त्याची बातमी करतायं
आता बास्स झालं जाऊ द्या, मी त्या माणसावर निवडणुकीतही नाही बोललो, व्यक्तिगत दोष आकसापोटी ते हे करत असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.

देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण; संजय राऊतांचा भाजप अन् शिंदे गटावर प्रहार

दरम्यान, मला या माणसाबद्दल काहीही उत्तर द्यायचं नाही. 2011 ला त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, त्याने जमीन बळकावली जामीन न घेता तो पळाला होता. वक्फ बोर्डाचा गुन्हा असे अनेक त्याच्यावर गुन्हा आहे. त्याने काहीतरी बडबड करायची अन् रोज बातम्या चालवतायं. उद्या माझा तेरावा जनता दरबार आहे. तुम्ही चांगलं काहीतरी लावा ना. त्याला काही काम ना धंदा उगच काहीतरी चालवतायं, या शब्दांत मोहोळ यांनी संताप व्यक्त केला आहे.

follow us