देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण; संजय राऊतांचा भाजप अन् शिंदे गटावर प्रहार

देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप शिंदे गटावर टीका केली.

  • Written By: Published:
News Photo (39)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो. तो आपपल्या भागाचं प्रतिनिधीत्व करत असतो. (Shivsena) निवडून आल्यावर तो कोणत्याही पक्षाचा नसतो आणि सरकारही कोणत्याही पक्षाचा नसतं. देवेंद्र फडणवीस आणि मिंधे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोकं आहेत, त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाचे आमदार त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे. हे घटनाबाह्य, बेकायदेशीर कृत्य आहे. असा थेट वार राऊत यांनी केला आहे.

देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे महाराष्ट्रात. तुम्हाला जर निधी हवा असेल, तर आमच्या पक्षात या. म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो. इतर कोणत्याही राज्यात असं घडलेलं नाही. भाजपची सरकारी अन्य राज्यात असली तरी हे उद्योग महाराष्ट्रात सुरु झाले आहेत. मला वाटतं की, सध्या या राज्याला राज्यपाल नाहीत. राज्यपाल असले तरी फरक पडत नाही कारण ते भाजपचे हस्तक असतात अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

ते अशीच वक्तव्यं करत राहिले तर त्यांना तात्या विंचू चावेल; राऊतांची महेश कोठारेंवर खरमरीत टीका

निधीच असमान वाटपं. आता तर जे आमचे आहेत, त्यांनाच निधी. मग इतर आमदार निवडणूक आलेले नाहीत का? हे प्रकरण न्यायालयात सुद्ध गेलं होतं. इतर पक्षातले आमदारही पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. पण यांची डोकी फिरलेली आहेत,अहंकार आहे. मस्तवाल पणा आहे, मग्रुरी आहे. जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीने वाटप आपपाल्या लोकात सुरु आहे. पाच कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास म्हणत नाही. आपपाल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही दिलेली लाच आहे. यातून किती विकासकाम होतील माहित नाही पण कमिशनबाजी नक्की होईल” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Tags

follow us