सर्वांचे मोबाईल, व्हॉट्सअप सर्वेलन्सवर टाकलेत; चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक विधान…
सर्वच कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्वेलन्सवर टाकले असल्याचं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडाऱ्यात बोलताना केलंय.
Chandrashekhar Bawankule News : भंडारा जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्वेलन्सवर टाकले आहेत, तुमचं एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करणार असल्याचं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलंय. बावनकुळे यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच निवडणुकीत कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली तर नेत्यांची कार्यकर्त्यांसाठी दारे बंद होतील, असा सज्जड दमही बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना भरलायं. भंडारा भाजपच्यावतीने दिवाळी स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते.
आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कितीही कट कारस्थानं करा…, धंगेकरांचा जैन बोर्डिंग प्रकरणात मोठा दावा
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, कार्यकर्त्यांचे मोबाईल व भंडाऱ्यातील व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत, तुमचं एक चुकीचं बटण पुढील पाच वर्षांचा सत्यनाश करेल. निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याचा रागात कार्यकर्ता, तमाशा करतो पण त्याने बंडखोरी केली तर नेत्यांची दारे बंद होतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिलायं.
तसेच तुमच्या चुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत, त्यामुळे चुकीचं बटण दाबून सत्यानाश करु नका. सर्वांचे मोबाईल फोन सर्वेलन्सवर टाकले आहेत. सर्व व्हॉट्सअप ग्रूप सर्वेलन्सवर टाकले आहेत. कोण काय बोलतंय त्यावर लक्ष असल्याचंही बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
पुण्याच्या सारसबागेतील दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात वाद; पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अनर्थ टळला
एक चुकीचं बटण भंडारा शहर उध्वस्त करेल…
तुमचं चुकीचं बटण पुढील पाच वर्षांचा सत्यानाश करेल. एका चुकीमुळे भंडारा शहराचं नुकसान होईल. निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही तर रागाच्या भरात काही लोकं तमाशा उभा करतात. तुमचं एक चुकीचं मत, बंडखोरीमुळे पक्षाला मोठा फटका बसणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
