पिंपळगाव (आळवा) ग्रामपंचायत परिसरातील नागरिक आक्रमक; आजपासून अमरण अन्नत्याग उपोषण

या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाच आंदोलन करू असा इशाराच नागरिकांनी दिला आहे.

  • Written By: Published:
News Photo (54)

पिंपळगाव (आळवा) ग्रामपंचायत हद्दितील नागरिकांना जिवनावश्यक त्या सेवा सुविधा मिळव्यात या मागणीसह इतर अनेक मागण्यांना घेऊन बुधवार दि.२३ ऑक्टोबर रोजीबेमुदत अमरण उपोषण (अन्नत्याग) सुरू करण्यात आलं आहे. या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाच आंदोलन करू असा इशाराच नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडं लवकर लक्ष घालाव अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

प्रमुख मागण्या

विषय :

१) विशेष ग्रामसभेच्या अधिकारांचे उल्लंघन केलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी….

२) २८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेच्या व्हिडीओ चित्रीकरण पाहुण गावातील रोजगार सहाय्यक निवड करावी.

३) पिंपळगाव (आळवा) ग्रामपंचायत हद्दितील नागरिकांना जिवनावश्यक त्या सेवा सुविधा मिळण्या बाबात.

४) पाणीपुरवठा व स्वच्छता योजना मधिल भष्ट्राचार करणाऱ्यावर कार्यवाही करावी.

५) पायाभुत सुविधा रस्ते, गटार, सिमेंट बाकडे, लाईट इत्यादी कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करुण त्यांचा निधी सरकार जमा व्हावा.

६) पिंपळगांव (आळवा) मधील सरपंच । ग्रामसेवक यांनी वेळोवेळी पदाचा गैरवापर / नियमबाह्य केल्याने त्यांच्यावर कार्यवाही करणेबाबत

उपोषणकर्ते :- राजु अमृतराव बारवकर

उपोषणाचे ठिकाण :- पिंपळगांव (आळवा) ग्रामपंचायत कार्यालयासमोर, पिंपळगांव (आळवा)

follow us