भारतीय मनोरंजनातला ऐतिहासिक क्षण; ‘क्योंकी सास भी कभी बहु थी 2’ मध्ये बिल गेट्स…

क्योंकी सास भी कभी बहु थी 2 मध्ये बिल गेट्स यांच्या एन्ट्रीवर हा भारतीय मनोरंजनातला ऐतिहासिक क्षण असल्याचं स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलंय.

Untitled Design (2)

Bill Gates In Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 : स्टार प्लस चॅनलवरील क्योंकी सास भी कभी बहू थी2 मालिकेत मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स झळकणार आहेत. मालिकेमध्ये बिल गेट्स, स्मृती इराणी, यांच्यासोबत एका व्हिडिओ कॉलमध्ये दिसून आले आहेत. मालिकेतील पुढील दोन एपिसोडमध्ये बिल गेट्स झळकणार आहेत. बिल गेट्स यांच्या एन्ट्रीवर हा भारतीय मनोरंजनातला ऐतिहासिक क्षण असल्याचं स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलंय.

खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश; पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाली मोठी मदत

एका विशेष मुलाखतीत स्मृती इराणी यांनी याबाबत भाष्य केलं आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील हा एक ऐतिहासिक क्षण असून क्योंकी सा भी कभी बहू थी मालिकेद्वारे समाजात एक आंदोलनच मांडण्यात आलं असून जेव्हा आईचे आरोग्य चांगले राहते तेव्हाच लहान मुलं चांगल्या पद्धतीने अभ्यास करुन एक मजबूत समाज घडत असल्याचं इराणी यांनी स्पष्ट केलंय.

प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी काहलोंवर कॅनडामध्ये गोळीबार; ‘या’ गँगने जबाबदारी स्वीकारली अन् कारणही सांगितलं

इराणी यांनी बिल गेट्स यांच्या भूमिकेबाबतही भाष्य केलं आहे. मला गर्व आहे मागील तीन महिन्यांपासून आम्ही समाजातील काही गोष्टी, हुंडाबळीच्या प्रकरणांना उचलून धरलं आहे. त्यामुळे समाजातील महिला आणि मुलांना एक चांगला संदेश मिळाला आहे. या प्रकरणांना वैश्विक स्तरावरही समर्थन मिळत असल्याचं इराणी म्हणाल्या आहेत.

History of Fireworks | फटाक्यांचा शोध कुणी लावला आणि सर्वप्रथम फटाके कुठे आणि कधी वाजला ? वाचा सविस्तर..

बिल गेट्स यांची या मालिकेत रोमांचक एन्ट्री झाली आहे. मालिकेमध्ये तुलसी आपल्या भूमिकेतून एक वेगळा संदेश पोहोचवणार आहे. हा क्षण मनोरंजन विश्वातील एक ऐतिहासिक क्षण आणि प्रेरणादायक असणार आहे. स्मृती म्हणाल्या, तुम्ही अमेरिकेतून थेट माझ्या कुटुंबाशी संपर्क साधत आहात याचा मला खूप आनंद आहे. आम्ही तुमची वाट पाहत होतो. यावर बिल गेट्स यांनीही प्रत्युत्तर दिलं, त्यावर ते म्हणाले, धन्यवाद, तुलसीजी लोक या प्रोमोवर मोठ्या उत्साहाने प्रतिक्रिया देत आहेत. तर एका व्यक्तीने म्हटले, स्मृती आणि तुलसीचा मला खूप अभिमान आहे.

follow us