Bill Gates : ‘चाय पे चर्चा’, बिल गेट्सला नागपुरातील डॉली चायवाल्याच्या स्टाईलची भुरळ
Bill Gates: भारत हा विविधतेने भरलेला देश असल्याचे म्हटले जाते. इथल्या लोकांच्या राहणीमानात जितका फरक आहे तितकाच फरक त्यांच्या नोकरी, काम आणि काम करण्याच्या पद्धतीत आहे. तर दुसरीकडे, सोशल मीडियामध्ये (social media) लोकांचे वेगळेपण शोधून त्यांना काही दिवसांतच जगभरात प्रसिद्ध करण्याची ताकद आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चहा विक्रेत्याबद्दल सांगत आहोत, जो काही दिवसात सोशल मीडियावर इतका प्रसिद्ध झाला की त्याच्या दुकानावर चहा पिणाऱ्यांऐवजी सेल्फी काढणाऱ्या लोकांच्या रांगा लागल्या आहेत.
View this post on Instagram
साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या स्टाईलमध्ये चहा बनवणाऱ्या डॉलीबद्दल आम्ही सांगतोय, जो कोणालाही आपला फॅन बनवतो. डॉलीच्या (Dolly ) अनोख्या स्टाइलचा चहा बनवण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती चहा विक्रेते असून तो नागपूरचा रहिवासी आहे. त्याची चहाची ‘डॉली की टपरी’ (Dolly Ki Tapri) खूप प्रसिद्ध आहे. सध्या मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स भारत दौऱ्यावर आहेत. त्यांना हटके चाय बनवणाऱ्या डॉलीच्या स्टाईलची चांगलीच भुरळ पडली आहे.
बिल गेट्स यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिल गेट्स हे डॉली चायवाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या चहा विक्रेत्याच्या स्टॉलवर असून, ते त्याच्या हातच्या खास चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्यांच्या या ‘चाय पे चर्चा’चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय .
हा व्हिडिओ करोडो लोकांनी पाहिला: हा चहाप्रेमी किती लोकप्रिय आहे याचा अंदाज तुम्ही फेसबुकवरील त्याच्या पोस्टला मिळालेल्या 18 कोटींहून अधिक व्ह्यूजवरून लावला असणार आहात. हा चहावाला केवळ अनोख्या स्टाईलमध्ये चहाच देत नाही तर कोणीही त्याचा चाहता होईल अशा पद्धतीने लोकांचे स्वागत करतो. आता त्याचा चहा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो अनोख्या अंदाजात चहामध्ये दूध ओतताना दिसत आहे. ग्राहकांकडून पैसे घेण्याची त्याची शैलीही अप्रतिम आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘आर्टिकल 370’चा धमाका; सहा दिवसांत केली 48 कोटींपेक्षा अधिक कमाई
सध्या डॉलीची टपरीही तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. सुमारे 20 वर्षांपासून लोक येथे चहा पिण्यासाठी येत आहेत. एवढेच नाही तर प्रथमच स्टॉलला भेट देणाऱ्या ग्राहकांना ते मोफत वेलची देतात. हे सर्व काम करण्याची प्रेरणा त्यांना दक्षिण भारतीय चित्रपटातून मिळाली. त्याने नेहमीच रजनीकांतची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि आता यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे.