‘गुम है किसी के प्यार में’ मधील किशोरीची ‘माना के हम यार नहीं’ मध्ये धमाकेदार एन्ट्री!

स्टार प्लसवर प्रदर्शित होणाऱ्या माना के हम यार नहीं मालिकेत अभिनेत्री किशोरी शहाणेची धमाकेदार एन्ट्री होणार आहे.

Kishori Shahane

Kishori Shahane : गुम है किसी के प्या में मधील अभिनेत्री किशोरी शहाणेची (Kishori Shahane) स्टार प्लसवर पुन्हा धमाकेदार एन्ट्री होणार आहे. माना के हम यार नहीं या मालिकेमध्ये किशोरी शहाणे झळकणार आहे. या शोची कास्टिंग अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढणार आहे. येत्या 29 ऑक्टोबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा सामाजिक असो किंवा राजकीय असो फक्त…, प्रकाश महाजन यांचं मोठ विधान

स्टार प्लसवर प्रदर्शित होणाऱ्या माना के हम यार नहीं या मालिकेत एक महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे आता किशोरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास तयार आहे. किशोरी या मालिकेमध्ये खुशी आणि कृष्णा यांच्या जीवनात एक मोठं वळण आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर किशोरी पुन्हा स्टार प्लसवर झळकणार आहे.

मर्दानी ३ मधून राणी मुखर्जी पुन्हा एकदा पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत झळकणार

या मालिकेमध्ये मनजीत मक्कड, कृष्णाची भूमिका पार पाडत असून एक शातिर व्यक्ती आणि कोणत्याही क्षण काहीही निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे. तर दिव्या पाटील खुशीच्या रुपात दिसणार आहे. एक मेहनत करणारी महिला आणि कपडे इस्त्री करुन आपला उदरनिर्वाह करणारी दिव्या पाटील असणार आहे.

स्टार प्लसवरील शोसाठी बी.आर. विजयालक्ष्मीच्या मुंबई पदार्पणाला सुपरस्टार रजनीकांत यांनी पाठिंबा दिला.

खुशी आणि कृष्णाचं संपर्कात येणं या मालिकेची सुरुवात असून एका नव्या अंदाजात हा सीन दाखवण्यात येणार आहे. ही मालिका स्टार प्लसवर प्रदर्शित करुन स्टार प्लसने एक मोठं पाऊल उचललं आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अनोखा आणि मजेदार अनुभव मिळणार आहे.

follow us