International Women’s Day 2024 निमित्त जागृत करू स्त्री शक्ती; तुम्हाला माहितीये महिलांचे हे विशेषाधिकार?
International Women’s Day 2024 : दरवर्षी 08 मार्च या दिवशी जगभरामध्ये महिलांच्या सन्मानार्थ महिला दिन ( International Women’s Day 2024 ) साजरा केला जातो. आजवर आपण या महिला दिनाचा इतिहास, तो का साजरा केला जातो? या सगळ्या विषयांवर चर्चा करत आलो आहोत. मात्र महिलांचं सशक्तिकरण करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्कांची आणि अधिकारांची देखील माहिती असले पाहिजे. त्यासाठीच आजच्या महिला दिन जाणून घेऊ भारतीय संविधानाने महिलांना दिलेले खास अधिकार. ज्यामुळे समानतेची बीजं रोवली गेली.
देवधरांचं त्रिपुरात मोठं कार्य, पुण्याला असाच लोकप्रतिनिधी हवा; लोकसभेच्या रेसमध्ये देवधरांचीच चर्चा
समान वेतन :
या कायद्यानुसार पुरुषांप्रमाणे महिलांना देखील समान कामासाठी समान वेतनाचा अधिकार आहे. भारतीय संविधानामध्ये लिंगाच्या आधारावर वेतन किंवा श्रमाची मजुरी यामध्ये भेदभाव करता येणार नाही. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिला अत्याचाराची तपासणी महिलांकडून :
भारतीय संविधानानुसार एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यास. तिची वैद्यकीय तपासणी ही एका महिलेकडूनच केली जाते. जेणेकरून संबंधित महिलेच्या सन्मानाला आणि गोपनीयतेला ठेच पोहोचणार नाही.
गडकरींची उमेदवारी पक्की, दुसऱ्या यादीत येणार नाव; तिकीट कापल्याच्या चर्चांना फडणवीसांचा फुलस्टॉप!
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ :
या कायद्यानुसार महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध तक्रार करता येते. या तक्रारीच्या निवारणासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली जाऊ शकते. जेणेकरून महिलांना कामाची जागा सुरक्षित होईल.
भारतीय संविधानाचे कलम 498 :
या कलमानुसार महिलांना शाब्दिक, आर्थिक, भावनिक आणि लैंगिक शोषणाचा घरगुती हिंसारापासून संरक्षण दिलं जातं. तसेच पीडित महिलेने या कलमांतर्गत तक्रार दाखल केल्यास. गुन्हेगारांना अजामीनपात्र तुरुंगवास भोगवा लागू शकतो.
Lok Sabha : ‘नगर’ लोकसभेसाठी राधाकृष्ण विखे? खासदार सुजय विखेंचं एकाच वाक्यात उत्तर
लैंगिक गुन्ह्यातील पिडीतांसाठी :
लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्या महिलांची गोपनीयता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना एकट्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर किंवा महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचे म्हणणे नोंदवण्याचा अधिकार आहे.
मोफत कायदेशीर मदत :
विधी सेवा प्राधिकरण कायद्यानुसार अत्याचार पिडीतेला मोफत कायदेशीर मदत दिली जाते. जेणेकरून या कठीण प्रसंगांमध्ये त्यांना न्याय मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये.
Naach Ga Ghuma: परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चं धमाकेदार पोस्टर रिलीज
अटकेशी संबंधित अधिकार :
अपवादात्मक परिस्थिती वगळता सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या आधी कोणत्याही महिला गुन्हेगाराला अटक केली जाऊ शकत नाही. यासाठी न्याय दंडाधिकारी आदेश देऊ शकतात. तसेच संबंधित महिला आरोपीची चौकशीही पोलीस महिला कॉन्स्टेबल आणि कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांच्या उपस्थितीतच केली जाऊ शकते.
भारतीय दंड साहित्याचे कलम 354 डी :
या कलमानुसार महिलांना त्यांच्यावर प्रत्यक्ष, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या द्वारे किंवा खाजगी संवादांवर पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. यामध्ये पाळत ठेवणे या गुन्ह्याच्या अंतर्गत संबंधितावर कारवाई करून महिलेचे संरक्षण केले जाते.