देवधरांचं त्रिपुरात मोठं कार्य, पुण्याला असाच लोकप्रतिनिधी हवा; लोकसभेच्या रेसमध्ये देवधरांचीच चर्चा
Sunil Deodhar : पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून सुनील देवधर ( Sunil Deodhar) आणि मुरलीधर मोहोळ या दोन उमेदवारांची नावे प्रचंड चर्चेत आहेत. त्यामध्येच नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये देवधर यांनी त्रिपुरामध्ये मोठं कार्य केलं आहे. त्यामुळे पुण्याला असाच लोकप्रतिनिधी हवा. असा सूर पाहायला मिळाला. विद्यावाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी पद्मश्री रमेश पतंगे यांच्या व’दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’ या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी आपलं मत व्यक्त केलं.
गडकरींची उमेदवारी पक्की, दुसऱ्या यादीत येणार नाव; तिकीट कापल्याच्या चर्चांना फडणवीसांचा फुलस्टॉप!
यावेळी बोलताना या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले विद्या वाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर म्हणाले की, सुनील देवधर यांनी पुण्यातून त्रिपुरात जावून केलेले कार्य खूप मोठे आहे. अनेक वर्षांच्या डाव्या विचारसरणीच्या गडाला खिंडार पाडण्याचे काम त्यांनी केले असून, त्यांच्यासारखे अभ्यासू, सुसंस्कृत आणि सुज्ञ लोकप्रतिनिधी आपल्या पुण्याला असणे अपेक्षित आहे. तसेच हे पुस्तक आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोलताना अभ्यंकर म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशातील आमूलाग्र क्रांतीचे अग्रदूत आहेत. देशात राष्ट्रीय चेतना जागवण्याचे काम संघाने केले, त्याच धर्तीवर नरेंद्र मोदी काम करत आहेत. राष्ट्राचा मुख्य स्वर हा धर्म आहे. पंतप्रधान मोदी देशात हिंदू धर्माला पुनर्स्थापित करत आहेत. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या जागेवर हा ग्रंथ प्रकाशित होणे, ही खूप भाग्याची गोष्ट आहे.
Lok Sabha : ‘नगर’ लोकसभेसाठी राधाकृष्ण विखे? खासदार सुजय विखेंचं एकाच वाक्यात उत्तर
याच कार्यक्रमात स्वतः देवधर देखील उपस्थित होते. त्यांनी या पुस्तकाबद्दल आपलं मत व्यक्त करताना म्हटलं की, नरेंद्र मोदींना पर्यायाची आवश्यकता नाही, तर विरोधकांना पर्याय उभा करण्याची गरज आहे. कारण एवढी वर्षे सत्तेचा उपभोग घेण्याचं काम काँग्रेसने केलं, परंतु मोदींनी मात्र जनतेसाठी पदाचा उपयोग केला. तसेच गुलामगिरीच्या सावटातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साकार करत आहेत.अशा भावना यावेळी भाजपाचे नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केल्या.
Naach Ga Ghuma: परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’चं धमाकेदार पोस्टर रिलीज
तर संघाची कार्यशैली समजल्याशिवाय संघ भाजपाचे संबंध लक्षात येत नाहीत! राष्ट्र एका अंगाने विकसित होत नाही, त्यासाठी सर्वांगीण विकास झाला पाहिजे! राजकीय क्षेत्र हे समाजाचे सर्वात महत्त्वाचे अंग असून, ‘राष्ट्र प्रथम’ हा सिद्धांत घेऊनच पंतप्रधान काम करत आहेत. अशा भावना पुस्तकाचे लेखक पद्मश्री रमेश पतंगे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केल्या.
पुण्यामध्ये लोकमान्य टिळक सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ येथे विवेक व्यासपीठ प्रकाशनाच्या माध्यमातून लेखक आणि समरसता विचारक पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या वाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर होते. लेखक पद्मश्री रमेश पतंगे, भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर आणि माजी खासदार प्रदीप दादा रावत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.