Lok Sabha : ‘नगर’ लोकसभेसाठी राधाकृष्ण विखे? खासदार सुजय विखेंचं एकाच वाक्यात उत्तर

Lok Sabha : ‘नगर’ लोकसभेसाठी राधाकृष्ण विखे? खासदार सुजय विखेंचं एकाच वाक्यात उत्तर

Sujay Vikhe on Ahmednagar South Lok Sabha Constituency : नगर दक्षिण मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण. नाव निश्चित नाही त्यामुळे निवडणुकीचं चित्रही अस्पष्ट आहे. परंतु, विखेंना वाढता विरोध ठळक दिसतोय. हा विरोध कुणाचा तर पक्षांतर्गत विरोधकांचाच. त्यामुळेच यंदा भाजप सुजय विखेंना डावलणार का? अशीही चर्चा कानी येत असते. यातच मग सुजय विखे (Sujay Vikhe)नाही तर दुसरा उमेदवार कोण? असा प्रश्नही आपसूकच उभा राहतो. यानंतर राज्याचे महसूलमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव (Radhakrishna Vikhe) पुढे येतं. या चर्चांवर विश्वास ठेवला तर खरंच आगामी लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील भाजपाचे उमेदवार असतील का? या प्रश्नाचे सूचक उत्तर खासदार सुजय विखे यांनी दिले आहे.

लोकसभेच्या अनुषंगाने भाजपकडून पहिली यादी जाहीर केली. दुसरी यादी लवकरच जाहीर होणार असून यात नगरमध्ये धक्कातंत्राचा अवलंब केला जाईल अशा चर्चा आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव नगर दक्षिण लोकसभेसाठी चर्चेत आहे. पक्षाकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांना डावलण्यात येणार अशी चर्चा आहे. यावर खासदार सुजय विखे म्हणाले, नाव कुणाचे चर्चेत असू द्या येत्या काही दिवसांत वस्तुस्थिती समोर येईल. केवळ नाव चर्चेत येऊन उपयोग नसतो तर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे असते. पक्षाला जो उमेदवार योग्य वाटतो त्याला उमेदवारी मिळेल मात्र असे असले तरी सोशल मीडियावर हायरल होणाऱ्या याद्यांवर विश्वास न ठेवता जी काही वस्तुस्थिती आहे ती लवकरच समोर येईल.

“शेळकेंचा अहंकार वाढला, आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या, आता जनताच”..रोहित पवारांनीही सुनावलं

लोकसभेच्या अनुषंगाने लवकरच जाहीर होणार असून यामध्ये कोणाची उमेदवारी निश्चित होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना खासदार सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. ज्या-ज्या राज्यांमध्ये भाजपाची युती नाही, मित्रपक्ष नाही ज्या ठिकाणी केवळ भाजप उमेदवार देणार आहे त्या-त्या ठिकाणचे उमेदवारी जाहीर केली आहे. आज महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे मित्रपक्षांशी बोलल्यानंतरच किती जागा वाट्याला येतात त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. या घडामोडींमुळे महाराष्ट्राची यादी मागे ठेवण्यात आली आहे मात्र येणाऱ्या एक दोन दिवसांमध्ये यादी जाहीर होईल असं खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट केलं.

लोकसभेची संधी मिळणार का?

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो कुणी महायुतीचा उमेदवार राहील तो किमान चार लाख मतांच्या फरकाने निवडून येईल असा विश्वास देखील यावेळी खासदार विखे यांनी व्यक्त केला. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने मला संधी दिली आणि जनतेने मला निवडून दिलं. आजवर पक्षाने मला सर्व काही दिलं आहे या काळातही जो काही निर्णय पक्ष घेईल त्याबाबत आम्ही समाधानी आहोत असं वक्तव्य विखे यांनी केले.

नाना पाटेकरांचा इन्कार तरीही राजकीय एन्ट्रीची चर्चा : शिरुरमध्ये अमोल कोल्हेंना आव्हान देणार?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज