Sujay Vikhe : मशाल घ्या, तुताऱ्या घ्या आणि वाजवा; खासदार विखेंची ठाकरे-पवारांवर टीका

Sujay Vikhe : मशाल घ्या, तुताऱ्या घ्या आणि वाजवा; खासदार विखेंची ठाकरे-पवारांवर टीका

Sujay Vikhe : खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar ) पक्षाला तुतारी चिन्ह मिळाले आहे. त्यावर टीका केली. कारण चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवार म्हणाले लढाई पूर्वी तुतारी वाजवली जाते. आम्ही हातात मशाल व तुतारी घेऊन निवडणुका लढवू. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की, मशाली घ्या तुतारी घ्या स्वागत आहे तुमचं. तुतारी वाजेल की, नुसती हवा निघेल हे देखील कळेल. तसेच फार तर फार तुतारी आम्ही तुम्हाला नव्या घेऊन देऊ अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी विखे यांनी केली.

श्रेयसने सांगितलं महेश मांजरेकरांसोबतच्या कामाबद्दलचं गुपित; म्हणाला, ‘प्रेक्षकांना कायम…’

कांदा निर्यात बंदी बाबतच्या निर्णयावरून खासदार सुजय विखे यांच्यावरती टीका टिपण्णी झाली. यावर खासदार सुजय विखे यांनी स्पष्टीकरण दिले मात्र भाजपचे आमदार राम शिंदे यांनी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरून विखे पिता पुत्रांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत जर विखे तिचा पुत्रांनी अमित शहा यांची भेट घेतली तरी पण निर्णय का झाला नाही. तसेच भेटीत याबाबत चर्चा झालीच की नाही अशी शंका राम शिंदे यांनी व्यक्त केली होती.

Akash Deep : फक्त एक चूक अन् आऊट झालेला फलंदाज नॉट आऊट; आकाशदीपनं नेमकं काय केलं ?

यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हटले की, मंत्री समितीचे अध्यक्ष हे अमित शहा असल्याकारणाने तेच हा निर्णय घेऊ शकतात. याबाबत एखाद्याला काही वेगळी भावना असेल तर त्यावर ती मला काही टिप्पणी करायचे नाही अशा शब्दात खासदार सुजय विखे यांनी यांनी राम शिंदे यांच्या वरती बोलणे टाळले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube