Akash Deep : फक्त एक चूक अन् आऊट झालेला फलंदाज नॉट आऊट; आकाशदीपनं नेमकं काय केलं ?
Akash Deep No Ball : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची (IND vs ENG Test Series) मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना रांची येथे सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियात (Team India) काही महत्वाचे बदल केले आहेत. या सामन्यात गोलंदाज आकाशदीपने (Akash Deep) पदार्पण केले आहे. या सामन्यात आकाशदीपच्या हातून एक मोठी चूक घडली ज्यामुळे बाद झालेल्या फलंदाजालाही नॉट आऊट देण्यात आले. आता या प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आकाशदीपने असं केलं तरी काय असा प्रश्न पडला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात बंगाल संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आकाशदीपला संघात स्थान मिळाले आहे. आकाशदीपनेही त्याची निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले आहे. या डेब्यू सामन्यात मात्र त्याने एक मोठी चूक केली आहे ज्याची चर्चा आता होत आहे.
Ind VS Eng: यशस्वीने शानदार शतक झळकविले; पण आनंदाच्या भरात केलेली चूक आली अंगलट
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जॅक क्रॉली आणि बेन डकेट सलामीला आले होते. चौथ्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर आकाशदीपने जॅक क्रॉलीली त्रिफळीचीत केले. पहिली विकेट मिळाल्यानंतर आकाशदीपने जोरदार जल्लोषही करायला सुरुवात केली. पण त्याचवेळी त्याचा हा आनंद अगदी औटघटकेचाच ठरला. ज्या चेंडूवर आकाशदीपने जॅक क्रॉलीला बाद केला तो नो बॉल होता. जॅक क्रॉली बाद झाला त्यावेळी तो फक्त 4 धावांवर होता. या चुकीनंतर आकाशदीपने हार मानली नाही. त्याने बेन डकेट, ऑली पोप आणि जॅक क्रॉली या तिघांना स्वस्तात बाद करत इंग्लंडच्या संघाला मोठे धक्के दिले.
कसोटी क्रमवारीत टॉप-5 बद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन 893 रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे. याशिवाय स्टीव्ह स्मिथ 818 रेटिंगसह दुसऱ्या, डॅरिल मिशेल 780 रेटिंगसह तिसऱ्या, बाबर आझम 768 रेटिंगसह चौथ्या आणि इंग्लंडचा जो रूट 766 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.
Ind vs Eng : भारताचा इंग्लंडवर 434 धावांनी दणदणीत विजय; जैस्वाल, रवींद्र जडेजा ठरले ‘हिरो’
वनडे क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व
एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर शुभमन गिल 801 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर, विराट कोहली 768 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आणि रोहित शर्मा 746 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 728 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. तर एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. बाबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 824 रेटिंगसह अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.