नाना पाटेकरांचा इन्कार तरीही राजकीय एन्ट्रीची चर्चा : शिरुरमध्ये अमोल कोल्हेंना आव्हान देणार?

नाना पाटेकरांचा इन्कार तरीही राजकीय एन्ट्रीची चर्चा : शिरुरमध्ये अमोल कोल्हेंना आव्हान देणार?

पुणे : सलग तिसऱ्या लोकसभा (LokSabha) निवडणुकीवेळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा होत आहे. यंदा त्यांना शिरुर (Shirur) लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. त्यानंतर शिरुरचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संभाव्य उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यामुळेही पाटेकर यांच्या उमेदवारीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (Will actor Nana Patekar get candidature from Shirur Lok Sabha constituency from NCP?)

यापूर्वी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी देखील नाना पाटेकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. 2014 मध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या विरोधात भाजपकडून त्यांना उमेदवारी देणे निश्चित मानले जात होते. पण पाटेकर यांनी या चर्चांचा इन्कार केला होता. त्यानंतर 2019 मध्येही याच प्रकारच्या चर्चा झाल्या होत्या. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाजकार्यामुळे जनमानसात त्यांची चांगली प्रतिमा तयार झाली होती. सोबतच सर्वपक्षांसोबत असलेले त्यांचे चांगले संबंध ही त्यांच्या जमेची बाजू मानली जात होती. मात्र त्यावेळी देखील पाटेकर यांनी ट्विट करुन या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

आता पुन्हा एकदा पाटेकर यांच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दोन वर्षांपूर्वी दिवाळीच्या काळात अजित पवार हे नाना पाटेकर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी राजकारणामध्ये येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण तेव्हा अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये होते. मात्र आता महायुतीत सामील झाल्यानंतर समीकरणे बदलली आहेत. आता शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजितदादांना तितक्याच ताकदीच्या उमेदवाराची गरज आहे. अशात अमोल कोल्हे यांनी मागील आठवड्यात तुम्ही देखील एक सेलिब्रेटी उमेदावराच्या शोधात होता अशी टिपण्णी केली. त्यामुळे हे सेलिब्रेटी उमेदवार म्हणजे नाना पाटेकर तर नाहीत ना? अशा चर्चांना सुरुवात झाली होती.

“बँडबाजा वाजलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने गडकरींना ऑफर देणे म्हणजे”.. फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला

दरम्यान, या सर्व चर्चांना नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा पूर्णविराम दिला आहे. आपला शिरूर मतदारसंघासोबत फारसा संबंध नाही, त्यामुळे या मतदारसंघातून लढण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याचे नाना पाटेकर यांनी कळविले असल्याची माहिती आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलतानाही नाना पाटेकर यांनी याविषयी भाष्य केले होते. “मला राजकारणात जाता येत नाही कारण जे पोटात आहे तेच ओठात येते. दुसऱ्या दिवशी मला त्या पक्षातून मला काढून टाकतील आणि महिन्याभराने सर्व पक्ष संपलेले असतील. मग कशाला जायचे तिथे? असे मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज