“बँडबाजा वाजलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने गडकरींना ऑफर देणे म्हणजे”.. फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला

“बँडबाजा वाजलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने गडकरींना ऑफर देणे म्हणजे”.. फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला

Devendra Fadnavis replies Uddhav Thackeray : ‘काळी संपत्ती गोळा करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले. मात्र, भाजप वाढविण्यात ज्यांची हयात गेली त्या नितीन गडकरी यांचं नाव अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही. दिल्लीपुढे झुकू नका. अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपातील दिग्गज नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना ऑफर दिली.

त्यांच्या या वक्तव्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) अत्यंत खोचक शब्दांत पलटवार केला. ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे. त्या पक्षाच्या अध्यक्षाने ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो माझ्याकडं या असं सांगण्यासारखं आहे, असे फडणवीस म्हणाले.

‘ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो माझ्याकडं या असं सांगण्यासारखं आहे. खरं म्हणजे गडकरी साहेब आमचे मोठे नेते आहेत. ज्यावेळी पहिली यादी आली त्यावेळी महाराष्ट्रात महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्राच्या जागांवर आम्ही चर्चा केली नाही.

महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर ज्यावेळी चर्चा होईल त्यात सगळ्यात आधी नितीनजींचं नाव येईल. त्यामुळे स्वतःला मोठं दाखवण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत यात त्यांचं हसं होत आहे’, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.

मोठी बातमी! भरती अन् दाखले कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून; मराठा आरक्षणप्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश

यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला दिलेल्या निर्देशावरही त्यांनी भाष्य केले. ‘एखादा मुद्दा ज्यावेळेस हायकोर्टासमोर असतो त्यावेळी न्यायालय अशाच प्रकारचे निर्देश देत असते. मागच्या वेळीही न्यायालयाने आम्ही दिलेलं मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं त्यावेळी सुद्धा हायकोर्टाने अशाच प्रकारचे निर्देश दिले होते. ज्यावेळी न्यायालयाने आरक्षण वैध ठरवले त्यावेळी आम्ही केलेल्या भरती सुद्धा वैध ठरवल्या होत्या’, असे फडणवीस म्हणाले.

मावळ गोळीबारावेळी कुणाचं सरकार?

राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता अब की बार गोळीबार सरकार अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर केली होती. ‘मी सुप्रियाताईंना इतकच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या 113 गोवारींचा पोलिसांच्या लाठीमारात मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं. सुप्रियाताई सध्या विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहेत त्यामुळे त्या रोज अशा प्रकारची वक्तव्ये करत असतात. फार गांभर्याने घेण्याची गरज नाही’, अशा शब्दांत फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादीचं विरोधाचं प्लॅनिंग, आढळरावही म्हणतात, “मी फरपटत जाणार नाही”; शिरुरचं तिकीट कुणाला?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज