मोठी बातमी! भरती अन् दाखले कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून; मराठा आरक्षणप्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश

मोठी बातमी! भरती अन् दाखले कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून; मराठा आरक्षणप्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश

Mumbai High Court on Maratha Reservation : राज्यातील मराठा समाजासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार  (Maratha Reservation) दहा टक्के आरक्षण दिले होते. मात्र, या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका (Mumbai High Court) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने काही महत्वाचे निष्कर्ष नोंदवले आहेत. या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहतील, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी आता येत्या मंगळवारी ठेवण्यात आली आहे.

राज्य सरकारने मागील महिन्यात विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक संस्थांतील प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारच्या भरतीत हे आरक्षण लागू करण्यात आले. राज्यात आगामी काळात पोलीस भरती, शिक्षक भरती आणि 50 हजार मेडिक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सदावर्ते यांनी केली होती.

Maratha Reservation याचिकाकर्ते विनोद पाटील लोकसभेच्या मैदानात; मराठा मावळे म्हणाले तर.. पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मराठा आरक्षणानुसार कोणतीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे लक्षात ठेवा असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या आरक्षणाविरोधात तसेच भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्यांच्या जाहिरातींविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकांवरही इतरांसोबत सुनावणी घ्यायची की तातडीच्या दिलाशाकरता स्वतंत्र सुनावणी घ्यायची याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे. भरती प्रक्रिया सुरू केली म्हणजे नियुक्त्या किंवा दाखले दिले असा त्याचा अर्थ होत नाही, अशी भूमिका महाधिवक्त्यांनी राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात मांडली. यासंदर्भात दाखल काही जनहीत याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचं मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठानं आधीच मान्य केलं आहे, असेही सांगण्यात आले.

Maratha Reservation : मराठ्यांनो निवडणुकीच्या मैदानात उतरा; प्रकाश आंबेडकरांची नवी खेळी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज