नगरच्या जागेवर भाजपचा डोळा, आमदार जगताप म्हणाले, ‘यात गैर काय…’

नगरच्या जागेवर भाजपचा डोळा, आमदार जगताप म्हणाले, ‘यात गैर काय…’

अहमदनगर : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांचे (Vidhansabha Election) वेध लागले आहे. मात्र, नगर जिल्ह्यात महायुतीला (Mahayuti) तडे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. कारण, नगर शहराची जागा महायुतीमध्ये भाजपला (BJP) सोडण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यावर आता अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी भाष्य केलं.

भारताचं पहिलं बजेट कुणी मांडलं? कुणाच्या नावावर बजेटचं रेकॉर्ड.. वाचा खास माहिती सविस्तर 

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. महायुतीमधून कोणी या जागेची मागणी केली असेल तर यामध्ये काही गैर नाही. शेवटी सर्व काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात, असे जगताप म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 22 जुलै रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. नगर शहरातील बंधन लॉन येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी ते महिलांशी संवाद साधणार आहे. राज्यात लाडकी बहीण योजना राबण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अजित पवार हे माता बहिणींशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

‘धर्मवीर – 2’ चा काळजाचा ठाव घेणारा ट्रेलर लॉन्च! सोहळ्याला शिंदे-फडणवीसांसह दिग्गजांची हजेरी 

दरम्यान येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका या आहेत. त्यापूर्वीच अजित पवार हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे, यामुळे त्यांच्या या दौऱ्याला एक राजकीय महत्व देखील प्राप्त झाले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी देखील नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता त्यापाठोपाठ अजित पवार देखील जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहे. आपल्या दौऱ्यात अजितदादा हे अनेक ठिकाणी भेटीगाठी घेणार आहे.

अजित पवारांच्या दौऱ्यावर बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, नेत्यांचे दौरे हे येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुरूच असतात. निवडणुका जवळ आल्या की नेतेमंडळी भेटीगाठी घेत असतात. यामुळे याला राजकीय दौरा म्हणता येणार नाही, असं जगपाप म्हणाले.

येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने नगर शहराच्या जागेची मागणी भाजपकडून केली जात आहे. याविषयी विचारले असता जगताप म्हणाले, राज्यात महायुती आहे. यामुळे एकटे अजित पवार नगर शहराच्या जागेबाबत काही निर्णय घेऊ शकत नाही. या जागेचा येणाऱ्या काळात एकत्र विचार करून यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जगताप यांनी दिली. तसेच देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणी जागेवर दावा केला असेल तर यामध्ये काही गैर नाही. मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातात, असं जगताप म्हणाले.

दरम्यान अकोले येथील सभेतून शरद पवार यांनी सूचक विधानाद्वारे विधानसभा उमेदवाराची घोषणा केली. तर नगरमध्ये देखील अजित पवार काही बोलणार का? तसेच विधानसभेतील उमेदवारांची घोषणा करणार का? याकडे देखील नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube