अजित पवारांवर टीका करणं टाळा, आम्हाला त्यांची गरज…; भाजप नेत्यांची संघाला विनंती
RSS-BJP Meeting : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी (RSS) संबंधित असलेल्या ऑर्गनायझर आणि विवेक या साप्ताहिकांमधून अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करण्यात आली होती. अजित पवारांमुळेच लोकसभेला फटका बसल्याची टीका या साप्ताहिकांतून करण्यात आली. त्यानंतर अजित पवार प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) तिसरी आघाडी करणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेत्यांनी संघाला अजित पवारांवर टीका करण्याची विनंती केली.
Singham Again: ‘सिंघम अगेन’ क्लायमॅक्स रिलीजपूर्वीच लीक? रोहित शेट्टीने सांगितले सत्य
येत्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजप आणि आरएसएस नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागावरही चर्चा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी सांगितली. अजित पवार हे महायुतीचे घटक असून विधानसभेला त्यांच्या मदतीची भापजला गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं टाळावं, अशी विनंती भाजप नेत्यांनी संघाला केली.
ध्रुव राठी पुन्हा अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात समन्स जारी, जाणून घ्या सर्वकाही …
भाजप नेत्यांनी संघाला आगामी विधानसभा निवडणुकीत सहकार्य करण्याची देखील विनंती करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहेत. तर विधानसभा निवडणुक जवळ असल्याने पक्षांतर्गत ताळमेळ ठेवा, अशी सूचना संघाने भाजपला केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत महायुतीने 48 पैकी किमान 40 जागा जिंकण्याचा निर्धार केला होता, मात्र महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागलं होतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केवळ 4 जागा लढवल्या होत्या. त्यातील एकाच जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. शरद पवारांचा पक्ष फोडून, पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह घेऊनही अजित पवारांच्या पदरी निराशाच पडली. अजित पवारांना सोबत घेतल्यानेच लोकसभेमध्ये भाजपला फटका बसल्याची भूमिका संघाशी जवळीक सांगणाऱ्या साप्ताहिकांनी घेतली. मात्र, आता भाजपच्या नेत्यांनी संघाच्या नेत्यांना याकडे सबुरीने घेण्याचं सांगितलं.