Virender Singh : पुरस्कार वापसी वेगात! पुनियानंतर आणखी एक कुस्तीपटू पुरस्कार देणार परत

Virender Singh : पुरस्कार वापसी वेगात! पुनियानंतर आणखी एक कुस्तीपटू पुरस्कार देणार परत

Virender Singh : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह यांच्या जवळचे संजय सिंग निवड झाली. या निवडीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) हीने कुस्ती सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर बजरंग पुनियानेही (Bajrang Punia) आपला पद्मश्री पुरस्कार थेट पीएम मोदी यांच्या घराबाहेर ठेवला. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूने पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. कुस्तीपटू विरेंदर सिंहने (Virender Singh) पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करत या प्रकरणात आपला निर्णय देण्याचे आवाहन केले आहे.

याआधी कुस्तीपटू बजरंग पुनियाने शुक्रवारी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्याने पुरस्कार परत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर विरेंदर सिंग यानेही आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. 2005 मधील डेफलिंपिक सुवर्णपदकाचा तो मानकरी आहे. त्याने या निर्णयाबाबत एक्सवर पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

विरेंदर सिंग हा गुंगा पहिलवान या नावाने देखील प्रसिद्ध आहे. 2021 मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याआधी 2015 मध्ये अर्जुन पुरस्कारही देण्यात आला होता.

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्याविरोधात कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर अनेक दिवस आंदोलन केले. त्याचे पडसाद संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून केली जात नसल्याचे दिसून येत होते.

अखेर कुस्तीपटू न्यायालयात गेल्याने पोलिसांना खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल करावे लागले होते. बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या विनेश फोगाटसह बजरंग पुनिया, संगीता फोगाट, सोनम मलिक आणि अंशू मलिक यांसारखे पहिलवान उपोषणाला बसले आहेत. कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनादरम्यान, देशातील अनेक विरोधी पक्षांनी उपोषणाला पाठिंबा दिला होता.

बजरंग पुनिया परत करणार ‘पद्मश्री’! मी ‘सन्मानित’ म्हणून जगू शकणार नाही; मोदींना धाडलं पत्र

दरम्यान, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व इतर पदासाठी निवडणूक झाली. त्यात संजय सिंह यांना चाळीस मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रकुल पदक विजेत्या अनिता श्योराण यांना केवळ सात मते मिळाली. तर इतर पदावरही बृजभूषण सिंह गटाने वर्चस्व मिळविले. संजय सिंह हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी निगडीत आहेत. तर बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. या निवडीनंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube