आता काय फासावर लटकू का? कुस्तीपटूंच्या विरोधानंतर ब्रिजभूषण सिंह यांचा संताप

आता काय फासावर लटकू का? कुस्तीपटूंच्या विरोधानंतर ब्रिजभूषण सिंह यांचा संताप

WFI Elections 2023 : WFI म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI Elections 2023) निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले आहेत. संजय सिंह यांच्या विजयानंतर कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली. इतकंच नाही तर स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Puniya) आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या घराबाहेर ठेवला होता. या घटनेनंतर कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यावर आता ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

आता काय फासावर लटकू का?
कुस्तीपटूंच्या सततच्या विरोधावर ब्रिजभूषण सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, काँग्रेसच्या कळपात बसलेल्या या पैलवानांच्या पाठीशी आपल्या देशातील एकही पैलवान उभा नाही. आता त्यांच्या आंदोलनानंतर मी काय फाशी घेऊ का? 11 महिने 3 दिवस कुस्तीला ग्रहण लागले होते. आता निवडणुका झाल्या आहेत. जुन्या महासंघाचा पाठिंबा असलेले उमेदवार म्हणजेच आमचे समर्थक उमेदवार संजय सिंह उर्फ ​​बबलू विजयी झाले. 40 विरुद्ध 7 अशा फरकाने जिंकले आहेत, कुस्तीचे काम आता पुढे नेण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

केजरीवालांच्या अडचणीत वाढ, औषध घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश

साक्षीच्या निवृत्तनंतरही ब्रिजभूषण यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाला, ‘साक्षीने कुस्तीतून निवृत्ती घेतली असेल तर मी काय करू? हे पैलवान गेल्या 12 महिन्यांपासून आम्हाला वाईट बोलत आहेत, शिव्या देत आहेत. पण त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार कोणी दिला? आज ते निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, सरकारवर सवाल करत आहेत.

Lili Thomas : राहुल गांधी ते सुनील केदार : सगळ्यांची अडचण ‘या’ महिलेने केलीये!

दरम्यान, बृजभूषण सिंह यांच्या जवळील व्यक्तीची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने व्यथित झालेल्या साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा जाहीर केली होती. यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियानेही (Bajrang Punia) पद्मश्री पुरस्कार सरकारकडे परत केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube