झुंडशाहीला प्रशासन बळी पडतंय का? जरांगेंच्या सभेपूर्वी शाळांना सुट्टी दिल्याने भुजबळांचा संताप

झुंडशाहीला प्रशासन बळी पडतंय का? जरांगेंच्या सभेपूर्वी शाळांना सुट्टी दिल्याने भुजबळांचा संताप

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. यासंदर्भात आज बीडमध्ये (Beed) जरांगेंची इशारा सभा होत आहे. या सभेसाठी बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यावरुन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी विशेष व्यवस्था कशासाठी? असा सवाल केला आहे.

छगन भुजबळ यांनी x सोशल मिडिया आकाउंटवर लिहिले की कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या सभेमुळे जिल्हा परिषदेने आपल्या प्राथमिक शाळांना थेट सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक काढले होते. त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर रात्री उशिरा ती सुट्टीची सूचना मागे घेण्यात आली. त्याविरोधात मी जाहीर सभा, प्रसारमाध्यमे आणि विधानभवनातही आवाज उठवला होता, असे त्यांनी म्हटले आहे.

Lili Thomas : राहुल गांधी ते सुनील केदार : सगळ्यांची अडचण ‘या’ महिलेने केलीये!

आता पुन्हा बीड जिल्ह्यात जरांगे यांच्या सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. हे या राज्यात नेमकं काय सुरू आहे? पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील अशा प्रकारे शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी ही विशेष व्यवस्था कशासाठी? असा सवाल केला आहे.

त्यांनी पुढं लिहिले की मराठा आरक्षणाला किंवा त्यासाठी सुरू असलेल्या सभांना माझाच काय, कोणाचाही विरोध नाही. परंतु ही झुंडशाही, हुकूमशाही सुरू आहे, त्याला मात्र नक्कीच विरोध आहे. मराठा समाजातील सुज्ञ बंधू-भगिनींना देखील हे अजिबात पटणार नाही. यातून आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करतोय? एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतंय का? असं असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही.

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकानिमित्त असणार खास उपक्रम

शालेय शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. नसता महाराष्ट्रातील इतर समाजांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube