ध्रुव राठी पुन्हा अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात समन्स जारी, जाणून घ्या सर्वकाही …

ध्रुव राठी पुन्हा अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात समन्स जारी, जाणून घ्या सर्वकाही …

Dhruv Rathee: लोकप्रिय यूटुबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो एकावेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ध्रुव राठी विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ध्रुव राठीला 29 जुलै रोजी समन्स बजावले आहे.

भाजप नेते सुरेश नखुआ (Suresh Nakhua) यांनी ध्रुव राठी विरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालयात (Saket Court) मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावर सुनावणी करताना साकेत न्यायालयाने राठीला 29 जुलै रोजी समन्स बजावले आहे. भाजप नेते सुरेश नखुआ यांनी ध्रुव राठीने त्याच्या व्हिडिओमध्ये त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

साकेत न्यायालयात जिल्हा न्यायाधीश गुंजन गुप्ता या प्रकरणाची सुनावणी करत आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. स्पीड पोस्ट, कुरिअर आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ध्रुव राठीला समन्स पाठवण्यात यावे असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहे.

नेमकं प्रकरण काय

माहितीनुसार, ध्रुव राठी युट्युबवर 7 जुलै 2024 रोजी My Final Reply to Godi Youtubers या नावाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने केलेल्या आरोपांमुळे याचिकाकर्ता सुरेश नखुआ यांना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत असल्याची तक्रार सुरेश नखुआ यांच्या वकिलाने केली आहे.

याचिकेत नखुआंच्या वकिलाने म्हटले आहे की, या व्हिडिओमुळे याचिकाकर्त्याच्या चारित्र्यावरच शंका निर्माण होत नाही तर समाजात त्यांना मिळालेला आदरही कलंकित होतो. त्यामुळे या व्हिडिओचे परिणाम दूरगामी होऊ शकतात आणि या व्हिडिओमुळे लोकांचा याचिकाकर्ता सुरेश नखुआ यांच्यावर असणारा विश्वास कमी होऊ शकते.

दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याचा चोख प्रत्युत्तर, एक जवान शहीद

तसेच या व्हिडिओमुळे नखुआ यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रांवर कधीही भरून न येणारा परिणाम झाला आहे. त्यामुळे साकेत न्यायालयात यूटुबर ध्रुव राठीच्या विरोधात मानहानीचा दावा करण्यात आला असल्याची माहिती सुरेश नखुआ यांच्या वकिलाने दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube