ध्रुव राठीच्या अडचणी वाढणार! कोलकाता प्रकरणात केली ‘ही’ गंभीर चूक

ध्रुव राठीच्या अडचणी वाढणार! कोलकाता प्रकरणात केली ‘ही’ गंभीर चूक

Dhruv Rathee : लोकसभा निवडणुकीच्या काळात चर्चेत राहिलेला युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा चर्चेत (Dhruv Rathee) आला आहे. यावेळचं कारण मात्र वेगळं आहे. ध्रुव राठीने एक मोठी चूक केली आहे ज्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोलकात्यातील ट्रेनी महिला डॉक्टर बलात्कार (Kolkata Doctor Case) आणि हत्येच्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. ध्रुव राठीने डॉक्टरची ओळख सोशल मिडियावर उघड केली. या चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. चूक लक्षात आल्यानंतर राठीने ही पोस्ट त्याच्या एक्स हँडलवरून डिलिट केली आहे. तरीही लोकांचा राग मात्र शांत झालेला नाही.

ध्रुव राठीने एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने म्हटलं होतं की ‘पश्चिम बंगालमधील (West Bengal) बलात्कार आणि हत्येचं प्रकरण अतिशय हृदयविदारक आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांची सुरक्षितता नाही आणि अत्यंत कठीण परिस्थितीत ते काम करत आहेत. सीबीआय या प्रकरणात वेगाने तपास करील आणि न्याय देईल अशी अपेक्षा आहे.’ या बरोबरच राठीने ‘निर्भया 2’ हॅशटॅग वापरला होता. यावर लोकांनी तीव्र आक्षेप घेतला. पीडितेसाठी ‘निर्भया 2’ म्हणणे म्हणजे असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे अशी टीका लोकांनी केली होती.

आंदोलन चिघळलं! कोलकात्यातील आरजी कर रुग्णालयात तोडफोड; पोलिसांचाही लाठीचार्ज

यानंतर आपली काहीतरी चूक झाल्याचं ध्रुव राठीच्या लक्षात आलं आणि ही पोस्ट डिलिट केली. ट्विट डिलिट करण्यामागं काय कारण आहे याचाही खुलासा राठीने केला. पीडितेला निर्भया 2 म्हणणं काही लोकांना असंवेदनशील वाटलं त्यांचा हा आक्षेप मला योग्य वाटला.

यानंतर वाद शांत होईल असे वाटले होते पण तसं काही झालं नाही कारण यानंतर ध्रुव राठीने आणखी एक पोस्ट केली. या पोस्टवर तर लोक भडकलेच. कारण राठीने या पोस्टमध्ये हॅशटॅगसह पीडितेचं नावच टाकलं होतं. यानंतर लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवत कारवाईची मागणी केली. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला असला तरीही तिचं नाव उघड होऊ नये असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याचं एका वकिलाने लक्षात आणून दिलं.

कोलकात्यातील रुग्णालयात जमावाची तोडफोड

दरम्यान, कोलकात्यात ट्रेनी डॉक्टर महिलेवरील बलात्काराच्या विरोधात (Kolkata Doctor Case) ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. काल मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त झालेल्या आंदोलकांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. या आंदोलना दरम्यान वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले. या भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटवण्यात आले. हॉस्पिटलबाहेर उभ्या असलेल्या एका दुचाकी वाहनाला आग लावून दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला तसेच गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही केला.

यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या; दिल्ली कोर्टाकडून समन्स जारी, नक्की काय आहे प्रकरण?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube