दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याचा चोख प्रत्युत्तर, एक जवान शहीद

दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याचा चोख प्रत्युत्तर, एक जवान शहीद

Poonch Firing : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुंछ (Poonch) जिल्ह्यात मंगळवारी पहाटे एलओसीवर (LOC) दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला.

समोर आलेल्या माहितीनुसार, या चकमकीत एक जवान जखमी झाला होता मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लान्स नाईक सुभाष चंद्रा असे शहीद जवानाचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लान्स नाईक सुभाष कुमार  कृष्णा घाटी भागात झालेल्या गोळीबारात जखमी झाला होता. शहीदाचा मृतदेह लष्कराच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या प्रकरणात जम्मू-स्थित लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल म्हणाले की, सैन्याने पहाटे 3 वाजता बटाल सेक्टरमध्ये गोळीबार करून दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. मात्र कृष्णा घाटी भागात झालेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला होता. जखमी जवानाला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कर्नल सुनील बारटवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लष्कराकडून शोध मोहीम सुरू आहे.

व्हाईट नाइट कॉर्प्सने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दोन्ही बाजूंमधील गोळीबारात एक जवान जखमी झाला, लष्कराचा जवान रुग्णालयात उपचारादरम्यान शहीद झाला… परिसरात ऑपरेशन सुरू आहे.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दहशतवाद्यांच्या एका ग्रुपने कृष्णा घाटी पट्ट्यातील बटाल सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र सतर्क जवानांनी तातडीने कारवाई केली.

जनता भूलथांपांना बळी पडणार नाही, विरोधकांचा उद्देश खोटं ‘नॅरेटिव्ह’ सेट करणे, मोहोळांचे प्रत्युतर

या कारवाईत लष्कराचा एक जवान शहीद झाला मात्र लष्कराकडून सुरु असलेल्या कारवाईमुळे जवानांनी दहशतवाद्यांना माघार घ्यायला लावल्याची माहिती समोर आली आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या