जम्मू-कश्मीरमध्ये दहवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद; अकोल्याच्या मोरगाव भाकरे गावावर शोककळा
Soldiers Martyred in Jammu-Kashmir Mourning for Akola : जम्मू-कश्मीरमध्ये (Jammu-Kashmir ) झालेल्या दहशदवाद्यांच्या चकमकीत राज्यातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे या गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हे तरुण जवान शहीद (Soldiers Martyred) झाले आहेत. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. जम्मू कश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यामध्ये लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक झाली. यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत.
Horoscope Today: आजचे राशी भविष्य 7 जुलै 2024, या राशीच्या लोकांनी नोकरीत सावधानतेने पाऊल उचला
दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याचं समजल्यानंतर सुरक्षा दलाने ही कारवाई सुरू केली होती. या कारवाईमध्ये त्यानंतर सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना ठार केलं. तसेच इतर चार जण अद्यापही लपून बसले असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दोन जवान शहीद झाले आहे. त्यात राज्यातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे या गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हे तरुण जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
बोलायची फारच खुमखुमी असेल तर आधी…; फडणवीसांनी महायुतीच्या प्रवक्यांना फटकारलं
हे जवान अवघ्या 24 वर्षाच्या आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. मात्र अद्यापही त्यांच्या घरी याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर त्यांचं पार्थिव गावामध्ये कधी दाखल येणार? याबद्दलही माहिती समोर आलेली नाही. 2019 मध्ये ते लष्करात भरती झाले होते. तर मोरगाव भाकरे हे गाव देखील सैनिकांचे गाव म्हणून ओळखला जात. या गावात अनेक तरुण सैन्यात जातात. मात्र या जवानाच्या शहीद होण्याने गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.