काश्मीरात रक्ताचे सडे, राज्यकर्त्यांवर फुलांची उधळण; BJP च्या सेलिब्रेशनवर ठाकरे गटाचा घणाघात

काश्मीरात रक्ताचे सडे, राज्यकर्त्यांवर फुलांची उधळण; BJP च्या सेलिब्रेशनवर ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray : काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अतिरेक्यांशी लढताना भारताचे तीन जवान शहीद झाले. नेमक्या त्याच दिवशी जी 20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींवर (PM Modi) भाजप कार्यालयात जंगी स्वागत करत पुष्पवृष्टी करण्यात आली. याच प्रसंगावर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली आहेत. जम्मू काश्मीर हा तर संवेदनशील विषय आहे. तेथे आजही जवानांच्या रक्ताचे सडे पडत आहेत आणि येथे राज्यकर्ते स्वतःवर फूल पाकळ्यांचे सडे पाडण्यात धन्यता मानत आहेत. संसदेच्या विशेष सत्रात चर्चा जरा यावरही होऊ द्या. जम्मू काश्मीरच्या भूमीवर फुलांचे सडे सुकून जातील, तुमच्या रक्ताचे सडे सदैव स्मरणात ठेवील.

 भाजपची लाट नाही, त्सुनामी येणार! राजस्थानात भरपावसात फडणवीसांची जोरदार बॅटिंग

पंतप्रधान मोदी यांच्यावर दिल्लीत जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. फुलांचा वर्षाव होत असताना मोदी भाजप (BJP) कार्यकर्त्यांना सुहास्य वदनाने हात वगैरे उंचावून अभिवादन करत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. मोदींवर फुलांचे सडे उधळले जात असताना जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आपल्या जवानांच्या रक्ताचे सडे पडत होते. लष्कर ए तोयबाचे अतिरेकी घुसले व जवानांची त्यांच्याशी चकमक झाली. त्यात भारतीय सैन्याच्या एका कर्नल आणि मेजरसह चार जांबाज अधिकाऱ्यांना हौतात्म्य आले.

निदान राजनाथ सिंह यांनी तरी..

काश्मीरातील स्थिती बरी नाही व मोदी सरकार जी 20 च्या यशाने (G20 Summit) हुरळून आणि विरघळून गेले आहे. जवान अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत असताना केंद्रीय निवडणूक समितीत सहभागी होण्यासाठी मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. मोदींनी जी 20 चे जे अफाट यश संपादन केले त्यामुळे त्यांच्यावर धो धो फुल उधळली गेली. त्यावेळी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) उपस्थित होते. कर्नल, मेजर, डीएसपींच्या मृत्यूचे सावट या नेत्यांच्या चेहऱ्यावर नव्हते. निदान राजनाथ सिंह यांनी तरी ते दुःख व्यक्त करण्याची कृती करायला हवी होती, असे या लेखात म्हटले आहे.

भारताचे जवान शहीद झाले, तेव्हा BJP च्या मुख्यालयात सेलिब्रेशन; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात 

..हा तर जनतेशी द्रोहच !

जम्मू काश्मीरातून 370 कलम हटवले असल्याने आता तिकडे सर्व आबादी आबाद होईल असे चित्र केंद्र सरकारने निर्माण केले पण, ते शेवटी खोटेच ठरले. 370 कलम हटवून साडेचार वर्षे झाली तरी येथे विधानसभेच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाचा तिथे दारुण पराभव होईल या भयाने निवडणुका होऊ न देणे हा जनतेशी द्रोह आहे, असा घणाघाती आरोप ठाकरे गटाने केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube