भारताचे जवान शहीद झाले, तेव्हा BJP च्या मुख्यालयात सेलिब्रेशन; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात

  • Written By: Published:
भारताचे जवान शहीद झाले, तेव्हा BJP च्या मुख्यालयात सेलिब्रेशन; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Aditya Thackeray on BJP : जम्मू-काश्मीरमध्ये काल दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. अनंतनाग, राजोरी या ठिकाणी भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका कर्नलसह मेजर आणि जम्मू-काश्मिर पोलीस दलातील उपअधिक्षक हे शहीद झाले तर लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याच वेळेस पीएम नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) भाजप (BJP) कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावरूनच ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपवर टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, काल अतिरेक्याचा हल्ला झाला, त्यात तीन जवान शहीद झाले होते. एकीकडे देशाचे जवान शहीद झाले तर दुसरीकडे भाजपचे नेते मुख्यालयात सेलिब्रेशन करत होते, असा गंभीर आदित्य ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, आजही काश्मिरी पंडितांचा आवाज कोणी ऐकत नाही. ते भारतीय नाहीत का?, असा सवाल त्यांनी केला.

आज नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ठाकरे मुख्यमंत्री असतांना अडीच वर्ष अडीच दिवसही मंत्रालयात आले नाहीत आणि आता दौरे करताहेत. यावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. सोळा वर्षे आमच्यावर टीका करण्यासाठी पगार मिळाला, त्यांच्यावरती काय बोलायचं, असं आदित्य म्हणाले.

Bombay Dyeing Land deal : 22 एकर जमिनीची 5200 कोटींना विक्री, कोणी केली जागा खरेदी? 

आज मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतले. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंच्या भेटीला गेले होते. याविषयी विचारले असता आदित्य ठाकरे ते म्हणाले, मनोज जरांगे यांनी आज उपोषण सोडले आहे. सरकार दिलेले आश्वासन पूर्ण करेल, अशी आशा आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमकीच्या घटना घडत आहेत. अनंतनागमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन अधिकारी शहीद झाले. आर्मीच्या एका कुत्र्यानेही कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करले. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) हुमायून भट हे अनंतनागमधील चकमकीत गंभीर जखमी झाल्यानं त्यांना वीरमरण प्राप्त झाले. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube