बोलायची फारच खुमखुमी असेल तर आधी…; फडणवीसांनी महायुतीच्या प्रवक्यांना फटकारलं

बोलायची फारच खुमखुमी असेल तर आधी…; फडणवीसांनी महायुतीच्या प्रवक्यांना फटकारलं

Devendra Fadnavis Speech : लोकसभा निडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांतील नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. अजित पवार गटातील नेते आणि भाजप नेत्यामध्ये सातत्याने शाब्दीक चकमकी होत असतात. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महायुतीच्या सर्वच प्रवक्तांना फटकारलं आहे.

बसपाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची हत्या, 8 संशयितांना अटक; उच्चस्तरीय चौकशीची मागणी 

मुंबईत आज महायुतीचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आज आपळाच एकमेकांत विसंवाद दिसतो. आज आपलेच प्रवक्ते एकमेकांविरुद्ध बोलत आहेत. जर कुणाला बोलायची खुमखुमी असेल तर त्याने आपआपल्या नेत्यांना अगोदर विचारावं. त्यांच्या नेत्यांनी होकार दिला तर आपली खुमखुमी पूर्ण करावी, अशा शब्दात फडणवीसांनी फटकारलं.

जानकरांनी वाढवली महायुतीची चिंता, रासपचा विधानसभेच्या 104 जागांवर दावा 

पुढं बोलतांना फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. पण, अपेक्षित यश मिळालं नाही. राजकारणात कधीकधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो. लोकसभेतील निकालावर मविआ म्हणतंय, आमचा प्रचंड मोठा विजय झाला. आपल्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्याच आहेत. महाराष्ट्रात मविआ 2 कोटी 50 लाख मतं मिळाली. तर महायुतीला 2 कोटी 48 लाख मतं मिळाली. केवळ 2 लाख मतं आपल्यापेक्षा त्यांना जास्त मतं मिळाली. या 2 लाख मतांमुळे माविआच्या 30 जागा जागा जिंकू शकलं. मात्र, आपण निर्धार केला आणि किमान 20 लाख अधिक मते जास्त घेतली तर आपल्याला 200 जागा येतील, असा विश्वास फडणवीसांना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलाय

यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले, लोकसभेत टेक्नीकली आपला आमचा पराभव झाला असला तरी आता आपण मैदानात आलो आहोत. विरोधक खोट बोलत होते. मात्र, आपण गाफील राहिलो. फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकासी आपल्याला लढावं लागणार आहे. सत्य चिरकाळ जिवतं राहतं. असत्याच्या आधारावर एक निवडणुक जिंकता येईल. दुसरी नव्हे. विरोधकांना खोट बोलायची चटक लागली असून विरोधक घरी तरी खंर बोलत असतील का हा प्रश्न आहे, अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube