जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद, ‘या’ संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद, ‘या’ संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Attack On Indian Army Convoy : दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआमधील बदनोटा भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. (Indian Army ) या हल्ल्यात भारतीय लष्कराचे (Army ) ५ जवान शहीद झाले, तर ५ जवान अजूनही जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

प्रयत्न केले पण, सरकारसाठी नंबर मिळाला नाही; शरद पवारांनी घडलं तेच सांगितलं

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील बदनोटा भागात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स घेत आहे. कठुआ मुजाहिद्दीनच्या बदनोटा भागात काश्मीर टायगर्सनी भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केला, या हल्ल्यात भारतीय सैन्याच्या दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आल
आलं असं पत्रकामध्ये सुरूवातीला म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ भागात काश्मीर टायगर्सच्या दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. काश्मीर टायगर्स नावाच्या संघटनेने यासंदर्भात एक पत्रकही जारी केलं आहे. पत्रक जारी करून त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

मुजाहिदीनचा हल्ला इतका भयंकर होता की, भारतीय सैन्याला हलण्याची संधीही मिळाली नाही आणि मुजाहिद्दीन सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले. आतापर्यंतच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात 7 सैनिक ठार झाले आणि 6 जखमी झाले आहेत. भारत नेहमीप्रमाणे आपले नुकसान लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे, ज्याचा लवकरच पर्दाफाश होईल हा हल्ला म्हणजे 26 जून 2024 रोजी शहीद झालेल्या तीन मुजाहिद्दीनचा बदला आहे. आम्ही लवकरच आणखी विनाशकारी हल्ले सुरू करू असंही त्या पत्रात म्हटलं गेलय.

विखेंची ग्वाही अन् लंकेंचं आंदोलन स्थगित;त्या मागण्यांवर सरकार सकारात्मक

दरम्यान कुलगाम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत मारले गेलेले सहा दहशतवादी हे स्थानिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की दहशतवादी अनेक महिन्यांपासून चनीगाम आणि मोदेरगाम गावात अत्याधुनिक काँक्रीट बंकरमध्ये लपून बसले होते. दरम्यान, सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून एके 47 रायफल्स जप्त केल्या आहेत. एके 47 रायफल्स व्यतिरिक्त, चनीगाम येथील चकमकीच्या ठिकाणाहून एक शक्तिशाली इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) देखील जप्त करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube