“प्रयत्न केले पण, सरकारसाठी नंबर मिळाला नाही”; शरद पवारांनी घडलं तेच सांगितलं

“प्रयत्न केले पण, सरकारसाठी नंबर मिळाला नाही”; शरद पवारांनी घडलं तेच सांगितलं

Sharad Pawar on NDA Government : लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नसलं तरी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला (NDA Government) बहुमत मिळालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापनही झालं. सरकार स्थापन झालं असलं तरी फार काळ टिकणार नाही असे दावे विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहेत. सरकार बहुमतात असतानाही असे दावे केले जात आहेत. विरोधकांच्या या दाव्यांत खरंच तथ्य आहे का? खरंच सरकार टिकणार नाही का? विरोधकांनी सरकार का स्थापन केलं नाही? या कळीच्या प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहेत. लेट्सअप मराठीच्या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर बेधडक मतं व्यक्त केली.

..तोपर्यंत एनडीए सरकारला भीती नाही

सध्याचं एनडीए सरकार आगामी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकेल का? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, मला साधारणतः खासदारांचा जो एक अंदाज घेतला निवडणुका कुणाला नकोत. निवडणुका पुन्हा घ्यायच्या त्याचा खर्च त्याचा वेळ या सगळ्या गोष्टी आणि त्याचा परिणाम सरकार जोपर्यंत हे एकत्र करतात तोपर्यंत येणार नाही प्रश्न कुठे येईल तर प्रश्न आंध्र सरकार चंद्रबाबूंचं किंवा बिहारकडून काही मागण्या सतत केंद्र सरकारकडे विशेषतः प्रधानमंत्र्यांकडं राहतील. आणि त्या मागण्यांचं स्वरुप इतकं मोठं असेल की केंद्र सरकारच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होईल.

राहुल गांधींबद्दल शरद पवारांचं मत काय?, लेट्सअप मराठीच्या महामुलाखतीत केला ‘हा’ मोठा दावा

त्यामुळे त्यांची मागण्यांची भूक ते जोपर्यंत भागवताहेत तोपर्यंत या सरकारला अडचण नाही पण उद्या त्याची शक्यता वाटत नाही पण मोदींना असं वाटलं की दोनच राज्यांपुरती अनुकूल भूमिका घेऊन चालणार नाही देश बघायला पाहिजे आणि जर ते होत नसेल तर स्वच्छ भूमिका घेण्याची त्यांची तयारी राहिली तर कदाचित या सरकारच्या कालावधीवर परिणाम होऊ शकेल. पण मला आता असं दिसतंय काही करून सत्ता टिकवायची हे धोरण मोदींचं दिसतंय त्यांचा विरोधकांबद्दलचा दृष्टीकोन अधिक प्रखर झाला आणि मित्र पक्षांबद्दल अतिशय विनम्रतेचा झाला अशी भूमिका घेऊन चालताहेत तोपर्यंत या सरकारला मला अडचण दिसत नाही, असे शरद पवार म्हणाले.

सरकार बनवण्यासाठीचा नंबर नव्हता

इंडिया आघाडीने सरकार स्थापन करण्याची चांगली संधी गमावली असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नावरही शरद पवार यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं. ते म्हणाले, असं आहे की शेवटी जागा तुमच्या किती आल्या आहेत हे महत्वाचं आहे. जागा पुरेशा असत्या तर सरकार बनवलं असतं पण निवडणुकीचा निकालात सुधारणा आहे. मागच्या पेक्षा जास्त जागा आहेत. आता काँग्रेसला चाळीसच्या आत जागा होत्या त्या 99 झाल्या. आमच्या सगळ्यांच्या जागा वाढल्या त्यामुळं सुधारणा होऊन सुद्धा सरकार बनवायला लागणारा नंबर आमच्या कुणाकडे नव्हता. प्रयत्न आणखी केले असते तर काय झालं असतं आता अशा गोष्टी मांडता येतात पण प्रयत्नांची पराकाष्ठा सगळ्यांनी केली हे नक्की.

Exclusive: देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार? शरद पवारांना तर तसंच वाटतंय..

लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचं अधिवेशन झालं अनेक नवीन खासदार भेटले तुमची आणि मोदींची काही भेट झाली का या प्रश्नाच्या उत्तरात शरद पवार  म्हणाले, नाही. सेंट्रल हॉलमध्ये ते येतच नाहीत. सेंट्रल हॉलच त्यांनी ठेवला नाही. नवीन सभागृहात सेंट्रल हॉलमध्ये कसं होतं लोकसभा असो राज्यसभा असो कोण कुठल्या पक्षाचा असो तु्म्ही जर वेळ असेल तर सेंट्रल हॉलमध्ये येऊन बसायचं. तिथे पक्ष कुणी पाहत नव्हतं. सहकारी म्हणून एकमेकांकडे पहायचं. मोदींना ती कल्पना पसंत नसवी. नवीन सभागृह बांधलं सेंट्रल हॉलच काढून टाकला. राज्यसभा आणि लोकसभा जसे जुन्या सभागृहात भेटत होते तसं आता भेटता येत नाही.

या नव्या सभागृहात जे आधीच्या सभागृहात एकमेकांशी सुसंवाद मतभिन्नता असेल पण सुसंवाद होता. ते आता पूर्णपणे रद्द केलं. पण माझ्या दृष्टीनं नवं सभागृह बांधण्याची आवश्यकताच काय होती? कशासाठी बांधलं? आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं. याची चर्चाही त्यांनी कुणाशी केली नाही. चार दोन लोकांशी केली असेल पण निदान आम्हाला माहिती नाही अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube