Sandeep Maheshwari vs Vivek Bindra : YouTube इतिहासातील सर्वात मोठा वाद, वाचा A To Z प्रकरण!

Sandeep Maheshwari vs Vivek Bindra : YouTube इतिहासातील सर्वात मोठा वाद, वाचा A To Z प्रकरण!

Sandeep Maheshwari vs Vivek Bindra :

मुंबई : यूट्यूब कम्‍युन‍िटीमधील दोन दिग्गजांमध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. सुप्रसिद्ध यूट्यूबर, मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari) आणि मोटिव्हेशनल स्‍पीकर डॉ. व‍िवेक ब‍िंद्रा (Vivek Bindra) हे दोघेही ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’च्या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत. माहेश्वरी यांनी सहा दिवसांपूर्वी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरुन या वादाची सुरुवात झाली होती. आता हा वाद आता एकमेकांना धमकी आणि आव्हान देण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. (Sandeep Maheshwari vs Vivek Bindra The Biggest Controversy in YouTube History)

काय आहे नेमका वाद?

संदीप माहेश्वरी यांना आपण ओळखतोच. यूट्यूबवर त्यांचे 2 कोटी 80 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही त्यांचे तेवढेच फॉलोअर्स आहेत. त्यांचे व्हिडिओही सतत टामईलाईनमध्ये दिसत असतात. त्यांच्या याच यूट्यूब चॅनलवर ते सध्या ‘बिझनेस मास्टरी’ नावाची एक फ्री सिरीज चालवत आहेत. या सिरीजमध्ये सहा दिवसांपूर्वी ‘बिग स्कॅम एक्स्पोज्ड’ अशा थंबनेलने त्यांनी एक व्हिडीओ अपलोड केला.

https://www.youtube.com/watch?v=yxTuj__LXJU&t=295s

या व्हिडिओमध्ये संदीप माहेश्वरी दोन मुलांशी बोलताना दिसत आहेत. एका ‘बडा यूट्यूबर’ च्या कोर्सला जाऊन त्यांना कसे नुकसान सहन करावे लागले याबाबतचा अनुभव ती दोन मुले सांगत असतात. यातील एक मुलगा म्हणतो की “तिथे बिझेनमनऐवजी सेल्समन बनवत आहेत. माईंड डायव्हर्ट करतात. तिथे फक्त त्यांचेच प्रोडक्ट विकायचे असतात. आधी तुम्ही नक्कीच बिझनेसमन व्हालं असे आश्वासन दिले जाते. पण तसे काहीही होत नाही. 50, हजार रुपये भरून कोर्सला गेलो होतो. मग हे उत्पादन म्हणून इतरांना विकावे लागते. याच गोष्टीला मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणतात.”

यावर माहेश्वरी म्हणतात, “म्हणजे थोडक्यात स्वतः तर मूर्ख ठरला आहातच, आता इतरांनाही मूर्ख बनवा… मग पैसा येईल” असे अप्रत्यक्षपणे सांगितले जाते’

त्यानंतर दुसरा मुलगा त्याचा अनुभव सांगू लागतो, ” तो म्हणतो, माझ्या एका पाहुण्यांचे ऐकून मी या ‘बडा यूट्यूबर’ च्या कोर्सला गेलो. 35 हजार रुपये देत प्रवेश घेतला. मात्र विविध प्रकारचे कोर्स तिथे होते. अगदी एक लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंतचे कोर्स उपलब्ध आहेत. यात तुम्हाला ट्रेनिंग दिले जाते. पण ट्रेनिंग घेतल्यावर कळले की ते त्यांचेच प्रोडक्ट विकायचे असते. यावर तुम्हाला कमिशन मिळते. ज्या पाहुण्यांचे ऐकून मी या कोर्सला गेलो होते त्यांना ते कमिशन मी गेल्यानंतर मिळाले. थोडक्यात तुम्हाला सेल्समन बनविले जाते. पण मला 35 हजार रुपये देऊन एक रुपयाही कमावता आला नाही. तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर हा कोर्स दुसऱ्या कोणाला तरी विका आणि तुमचे पैसे कमवा किंवा मग तुमच्या 35 हजारांवर पाणी सोडा.

व्हिडीओ काढण्यासाठी दबाव अन् धमक्या : माहेश्वरींचा खळबळजनक दावा

हा व्हिडीओ पब्लिश झाला आणि काही वेळताच या प्रकरणाचे रुपांतर एका वादात झाले. संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या यूट्यूब कम्युनिटीमध्ये पोस्ट करत त्यांचा ‘बिग स्कॅम एक्स्पोज्ड’ हा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी धमक्या येत असल्याचा मोठा आणि खळबळजनक दावा केला.

Screenshot 2023 12 19 182730

माहेश्वरी म्हणाले, ‘बिग स्कॅम एक्स्पोज्ड’ हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी माझ्या टीमवर खूप दबाव आहे. पण मी हे ठामपणे सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा व्हिडीओ डिलीट करणार नाही. व्हिडिओत ज्या मुलांनी हा घोटाळा उघड केला, त्यांनाही त्यांचे स्टेटमेंट्स मागे घेण्यासाठी, स्टेटमेंट बदलण्यासाठी बरेच कॉल्स आले. या सर्व कॉल्सचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत. मला असे वाटते की हे प्रकरण आणखी खालच्या थराला जाणार आहे. पण मी त्यासाठी तयार आहे. कारण मी माझ्या समाजासाठी उभा आहे. मला माहित आहे की मी एकटाच नाही. तुम्हीही सर्व माझ्या पाठीशी उभे आहात.

डॉ. विवेक बिंद्रा यांची एन्ट्री :

माहेश्वरींच्या या पोस्टनंतर या प्रकरणात ‘बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ आणि संस्थापक’ डॉ. विवेक बिंद्रा यांची एन्ट्री झाली आणि दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले. बिंद्रा यांनी यूट्यूब कम्युनिटीवर लिहिले,

‘संदीप भाई, ‘बिग स्कॅम एक्स्पोज्ड’ हा तुमचा नवीन व्हिडिओ मी पाहिला, हे माझ्याशी आणि माझ्या कंपनीशी संबंधित आहे याची तुम्ही कबुली दिली आहे. मला असे वाटते की मी माझ्या अधिकृत आयडीवरून याबद्दल खुलेपणाने चर्चा केली पाहिजे, जेणेकरून दर्शकांच्या मनात कोणताही गोंधळ होणार नाही. तुम्ही मला तुमच्या शोमध्ये आमंत्रित केले होते, जिथे मी तुमच्या सर्व प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे दिली.

मला तितक्याच प्रामाणिकपणे सांगायचे आहे की, जर प्रेक्षकांना माझ्याबद्दल काही प्रश्न असतील तर मी तुमच्या शोमध्ये पुन्हा येण्यास तयार आहे आणि त्यावर मोकळेपणाने चर्चा करण्यास तयार आहे. मी तुम्हाला एक खुले आव्हान देतो. पण आता तुमच्यात वास्तवाला सामोरे जाण्याची हिंमत आहे का? मी उद्योजकांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे, उद्योजक लॉन्चपॅडमध्ये हजारो तरुण उद्योजक आले आणि ते रिकाम्या हाताने परत गेले नाहीत. त्यांना वरिष्ठ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले. यानंतर, मी उद्योजकांसाठी 10 दिवसांचा एमबीए प्रोग्राम घेऊन येत आहे आणि तो पूर्णपणे फ्री असणार आहे. तरीही मी तुमचा आदर करतो आणि तुमच्या काही सूचना किंवा प्रस्ताव असतील तर मी तुमच्या शोमध्ये पुन्हा समोरासमोर चर्चेसाठी यायला तयार आहे. कधी यायचे ते सांग.

Screenshot 2023 12 19 183032

ते पुढे लिहितात, ‘राहिला प्रश्न आमच्या कोणत्याही कर्मचार्‍यांकडून धमकावण्याचा. तर तो आमच्या संस्कृतीचा भाग नाही. माझ्या टीममधील कोणीही असे काही केले असेल तर  कोणतेही एडिटिंग न करता तुमच्याकडे असलेले कॉल रेकॉर्डिंग शेअर करा, मी स्वतः त्यांच्यावर कारवाई करेन. (माझ्याकडे रेकॉर्डिंग देखील आहे) तुम्ही माझा नंबर ब्लॉक केला आहे आणि माझ्याशी बोलणे टाळत आहात. तुम्ही माझ्याबद्दलच्या 5000 हून अधिक पॉझिटिव्ह कमेंट्स डिलीट केल्या आहेत. (माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत).

विवेक बिंद्रांनी पुढे लिहिले की, ‘हे खरे आहे की माझे संचालक आणि चीफ ऑफ स्टाफ तुमच्या घरी आले होते. पण यामागे कारण होते ते, तुमच्याशी मनमोकळ्या चर्चेसाठी तुमची वेळ हवी होती (आम्हाला तुमचा स्वभाव माहित आहे त्यामुळे काय घडले याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे) आम्ही संपूर्ण YouTube कम्युनिटीसोबत उभे आहोत. आम्ही तुमच्यासोबत काही चुकीचे करण्याबाबत विचारही करु शकत नाही. राहिला प्रश्न व्हिडीओ डिलीट करण्याचा, तर कोणत्याही पुराव्यांशिवाय आणि संधीचा फायदा घेऊन बोलणाऱ्या प्रभावशाली लोकांना नोटीस पाठविणे माझा अधिकार आहे. पुढच्या चर्चांसाठी तुम्ही बोलवाल तेव्हा मी येईन, पण मला माहिती आहे की, तुमच्यामध्ये सत्याला सामोरे जाण्याची हिंमत नाही.

यावर प्रत्युत्तर देताना संदीप माहेश्वरी यांनी या प्रकरणावर आणखी दोन पोस्ट केल्या.

पहिल्या पोस्टमध्ये माहेश्वरी म्हणाले, 

माझा प्रिय मित्र विवेक,

एका बाजूने तुम्ही माझ्या टीमला कायदेशीर कारवाईची धमकी दिली (आत्ताच मी तुमचे कॉल रेकॉर्डिंग ऐकले आहे) आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना माझ्या घरी पाठवले. एकदाही नाही… अनेकदा. पण मी तुमच्या धमक्यांना घाबरत आहे, असे तुम्हाला खरंच वाटते का?

Screenshot 2023 12 19 182758

घाबरतात ते जे काही तरी चुकीचे करतात. मी माझ्या स्वतःच्या भल्यासाठी नाही तर सर्वांच्या भल्यासाठी काम करत आहे… आणि मी मरेपर्यंत करत राहीन… तुमच्यासारखे लाखो लोक मिळूनही मला थांबवू शकत नाहीत. आणि मला एकटे समजण्याची चूक करु नका. संपूर्ण YouTube कम्युनिटी माझ्यासोबत आहे. सर्व YouTubers (लहान आणि मोठे) आता तुम्हाला उघड पाडतील, तुमचे नाव घेऊन तुमच्या बडा बिझनेबद्दल उघड बोलतील. कोणा कोणाला धमकावून त्यांचा व्हिडीओ हटवणार? एक डिलीट केला तर आणखी हजारो व्हिडिओ बनवले जातील. लोकांनी एकदा ठरविले तर कोणीची जिंकू शकत नाही, मग पंतप्रधान असो की मुख्यमंत्री असो. तुम्ही तर कोण मग?

आता पब्लिक विरुद्ध विवेक बिंद्रा अशी ही लढाई आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये माहेश्वरी म्हणाले,

ज्यांना केस आहेत, ज्यांना गरज आहे, अशा लोकांना कंगवा विकणे हा घोटाळा होत नाही, तो एक प्रामाणिक आणि चांगला व्यवसाय आहे. पण एका टक्कल पडलेल्या व्यक्तीला त्याचे केस एका महिन्यात परत येतील असे सांगून 50 हजार रुपये किंमतीचा जादूई कंगवा विकणे. तो निरुपयोगी ठरल्यानंतर जादा किंमतीच्या त्या कंगव्याचे पैसेही परत न करणे हा घोटाळा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या व्यक्तीला तो कंगवा इतरांना विकण्यास सांगणे हा तर निश्चितपणे एक घोटाळा आहे. अशा घोटाळ्याने लाखो निरपराध लोकांचे कष्टाचे पैसे बुडाले जात आहेत. त्यांची बाजू घेऊया…

Screenshot 2023 12 19 182812

यानंतर आता माहेश्वरी यांनी तिसरी पोस्ट करत विवेक बिंद्रा यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. 

विवेक बिंद्रांच्या 3 मोठ्या चुका…

1. आमच्या टीमने माझ्या व्हिडिओमध्ये त्यांचे नाव एडिट केले. कारण कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला किंवा कंपनीला लक्ष्य करण्याचा आमचा विचार नव्हता. तो व्हिडिओ केवळ लोक कल्याणासाठी आणि जनजागृती करण्यासाठी बनवला होता. पण आपल्याला त्यांची भीती वाटते म्हणून आपण त्यांचे नाव घेतले नाही असे त्यांना वाटले. ही त्यांची पहिली मोठी चूक होती.

Screenshot 2023 12 19 182831

2. त्यांनी माझ्या घरी आणि ऑफिसमध्ये त्यांच्या लोकांना पाठवायला सुरुवात केली. का? मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एकदाच त्याच्याशी बोललो… तेही माझ्या टीमने त्यांना माझ्या स्टुडिओत बोलावले होते. तो माझा मित्र किंवा शत्रू नाही. ते मला का धमकवत होते? त्याची गरज नव्हती. ही त्यांची दुसरी मोठी चूक होती.

3. ते खरोखर अपरिपक्व आहेत. आता काहीतरी करण्याचा विचार करत आहेत… ही त्यांची तिसरी मोठी चूक असणार आहे.

माहेश्वरी यांच्या या व्हिडीओ आणि कम्युनिटी पोस्टवरती लाखो लोक कमेंट करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देत आहेत. त्याचवेळी काही कमेंटमध्ये आपणही अशा कोर्सला बळी पडल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय कायदेशीर मुद्दे आणि वाद समोर येतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. मात्र आजवरचा YouTube च्या इतिहासातील हा सर्वात मोठा वाद असल्याचे मानते जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube