Download App

उष्णतेने मोडला 122 वर्षांचा विक्रम: खबरदारी घ्या अन्यथा….

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात उष्णतेने (Heat wave) फेब्रुवारीतील 122 वर्षांचा विक्रम मोडला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि मध्य भारतात दिवसाचे सरासरी तापमान सामान्यपेक्षा 1.73 अंश सेल्सिअस जास्त होते. यापूर्वी 1901 मध्ये फेब्रुवारीमध्ये 0.81 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) मार्च ते मे या कालावधीत उष्णतेची लाट येण्याची सूचना जारी केली आहे.

मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उत्तर कोकणात देखील मार्च ते मे महिन्यादरम्यान उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार, तापमान 40 अंशांपार जाण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. पण याची तीव्रता कमी असणार असे हवामान विभागाने सांगितलेय.

मार्च महिन्यात देशातील अनेक भागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये ईशान्य भारतासह मध्य भारत आणि उत्तर भारताचाही समावेश आहे. देशातील काही भागात सरासरी तापमानापेक्षा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

Threat : अंबानी, बच्चन अन् धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावलाय…

संभाव्य उष्माघातासाठी काय करावे, काय करु नये, याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याशिवाय उष्णतेमुळे होणाऱ्या आजारासंदर्भातही माहिती दिली आहे.

काय करायचं
लिंबू, पाणी, ताक/लस्सी, फळांच्या ज्यूसचं जास्तीत जास्त सेवन करा..
दुपारी 12 ते दुपारी तीन या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका
तहान न लागताही पाणी प्या
सुती कपडे परिधान करा.. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका.. उन्हात जाताना डोकं झाका…
ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन (ओआरएस) याचा वापर करा…
बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये मुलांना कधीही एकटे सोडू नका.

काय करू नये
उच्च प्रथिने आणि गोड खाणे टाळा
चहा, कॉफी, अल्कोहोल आणि जास्त प्रमाणात साखर असलेले पेय टाळा.
तसेच उच्च प्रथिने आणि शिळे अन्न पासून दूर रहा.
उष्णता वाढलेली असताना स्वयंपाक करणे टाळा.

Tags

follow us