Valentine Day : व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) निमित्त जाणून घेऊ प्रेमाची भाषा नेमकी कोणती आहे? असं म्हटलं जातं की प्रेमाला कोणतेही भाषण नसते. प्रेम ही भावना आहे. जे जात धर्म भाषा बघत नसते. तसेच ही भावना समजून घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य कमी पडतं. प्रेमाची कबुली देण्यासाठी डेटिंग किंवा लग्न याचे देखील आवश्यकता नसते. आई वडील भाऊ बहीण मित्र यांच्यातील प्रेम दाखवावे लागत नाही. मात्र प्रेमी योगुलांमध्ये हे काहीसं वेगळं असतं तिथे कधी पुष्पगुच्छ कधी ग्रीटिंग कार्ड कधी वस्तू देऊन एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केले जातात.
प्रेमाची भाषा कोणती असते
प्रेमाची भाषा समजणं तसं कठीणच आहे. त्यामुळेच डॉक्टर गैरी चॅपमॅन यांनी त्यांच्या 1992 साली आलेल्या ‘द फाइव लँग्वेजेस हाऊ टू एक्सप्रेस हार्ट फेल्ट कमिटमेंट युअर मेट’ या पुस्तकात लिहिलं आहे की, प्रेमाची भाषा समजण्यासाठी लोकांना जास्त संघर्ष करावा लागतो. प्रेमाची भाषा किंवा प्रेम व्यक्त करण्याच्या पाच पद्धती आहेत.
राष्ट्रवादीच्या आधारवडाला काय मिळणार?; वडाचं झाड, कपबशी की शिट्टी; EC कडे तीन प्रस्ताव
यामध्ये तुमच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून तुमच्या साथीदाराला वेळ देणे, गिफ्ट देणे, मदत करणे तसेच एक प्रेमळ स्पर्श यांचा त्यामध्ये समावेश होतो. चॅपमॅन यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक व्यक्तीची एक प्राथमिक आणि माध्यमिक प्रेमाची भाषा असते त्यावर त्यांच्या प्रेमाचे स्वरूप अवलंबून असते.
दोन केंद्रीय मंत्र्यांचा जीव भांड्यात! नारायण राणेंसह सहा जण उमेदवारीसाठी अजुनही वेटिंगवरच
आता पाहूयात भारतीय लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतं माध्यम निवडतात? दिल्लीतील एका रिलेशनशिप काउन्सलर यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, भारतीयांमध्ये आपल्या पत्नीला किंवा पत्नीला त्यांच्या कामांमध्ये मदत करणे, त्यांचे वेगवेगळे बिल पे करणे किंवा त्यांची प्रेमाने विचारपूस करणे या पद्धतीने प्रेम व्यक्त केले जात होते.
मात्र अलीकडच्या काळामध्ये हे बदलले आहे. यामध्ये आता आय लव्ह यू म्हणत प्रेम व्यक्त केले जाते. तसेच शारीरिक स्पर्शातून देखील प्रेमाची कबुली दिली जाते. सोबत वेळ घालवला जातो. एकमेकांना लहान मोठे गिफ्ट दिले जातात. मात्र यामध्ये भाषेचा विचार केला तर सर्वाधिक भारतीय तरुणाई हे त्यांच्या प्रेमाचा प्रेमाची कबुली इंग्रजी भाषेमध्ये येत असल्याचे पाहायला मिळतं.