Valentines Day हा आता फक्त एका दिवसाचा उत्सव राहिलेला नाही, तर संपूर्ण आठवडाभरासाठी बिझनेसचा सुवर्णकाळ बनला आहे. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि D2C ब्रँडसाठी, हा काळ वर्षातील सर्वात मोठ्या विक्रींपैकी एक बनला आहे. फॅशन, दागिने, सौंदर्यापासून ते लैंगिक आरोग्यापर्यंत प्रत्येक श्रेणीमध्ये मागणी वेगाने वाढली असून, झेप्टो, ब्लिंकिट आणि इन्स्टामार्ट सारख्या अॅप्सनी 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन डेसाठी विशेष विभाग सुरू केले होते. ज्यात ऑर्डर्सची त्सुमानी आल्याचे पाहण्यात मिळाले.
झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्टवर 10X वाढ
व्हॅलेंटाईन डे साठी, इन्स्टंट कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या अॅप्सवर समर्पित क्युरेटेड सेक्शन सुरू केले. ज्यात दागिने, ग्रीटिंग कार्ड्स आणि प्लश टॉयज यासारख्या श्रेणींमध्ये दरवर्षी 10 पट वाढ झाली आहे. तर, सेक्शुअल वेलनेस श्रेणीतील विक्रीतदेखील तिप्पट वाढ झाल्याचे चित्र आहे.
झेप्टोने 7 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन प्रोम नाईट नावाचा एक ऑफलाइन कार्यक्रम देखील आयोजित केला होता, ज्यामुळे ब्रँड एंगेजमेंट वाढली. प्लॅटफॉर्म्सनी डार्क स्टोअर्समध्ये प्री-स्टॉकिंग देखील वाढवले आहे आणि डिलिव्हरी पार्टनर्सची संख्या वाढवली.
भरपेट जेवणाचं टेन्शनचं मिटलं ना राव! लग्नातलं जेवण अन् जोरदार ढेकर; ‘BuffetGPT’ नेमकं काय?
सेक्शुअल वेलनेस ब्रांड्सच्या विक्रीत तुफान वाढ
फ्लिपकार्ट मिनिट्सने व्हॅलेंटाईन विकदरम्यान तरुणांना लक्ष्य करून रिलेशनशॉप विभाग सुरू केला. कंपनीच्या मते, 7 ते 11 फेब्रुवारी दरम्यान वार्षिक तुलनेत 8 पट वाढ झाली. तर, मायम्यूज सारख्या सेक्शुअल वेलनेस ब्रँडने क्विक कॉमर्स अॅप्सवर दरवर्षी 50 ते 60 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेची मागणी वाढत असून, ब्रँड सर्चमध्येही झपाट्याने वाढ झाली असल्याचे कंपनीचे सह-संस्थापक साहिल गुप्ता यांनी सांगितले आहे. तर, व्हॅलेंटाईन डे हा असा काळ आहे जेव्हा लोक या उत्पादनांबद्दल संकोच न करता बोलतात, ज्यामुळे नवीन ग्राहकांची संख्या वाढते. या श्रेणीतील इंस्टंट आणि डिस्क्रिट विक्रीमध्ये मोठी भूमिका बजावत असल्याचे बोल्ड केअरचे सीईओ रजत जाधव सांगतात. युनिकॉमर्सच्या आकडेवारीनुसार, 1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान क्विक कॉमर्स ऑर्डरमध्ये वर्षिक 48 टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे.
