What does psychology say? : फक्त ‘ठीक आहे’ म्हणण्याच्या सवयीवरून कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा मानसिक आरोग्याबद्दल खात्रीशीरपणे सांगता येत नाही. पण मानसशास्त्रीय संशोधन काय सांगते? कोणाशीही बोलताना तुम्ही अनेकदा अशा लोकांना पाहिले असेल, जे जवळपास प्रत्येक गोष्टीच्या उत्तरात फक्त ‘ठीक आहे’ असे म्हणून मोकळे होतात. तुम्ही त्यांना एखादा सल्ला मागितला, तुमची अडचण सांगितली किंवा एखाद्या मुद्द्यावर वाद घातला, तरी त्यांचे उत्तर अनेकदा एकच असते – ‘ठीक आहे’. पहिल्या नजरेत ही सवय सामान्य वाटू शकते, परंतु अनेकदा एखाद्या व्यक्तीचे वारंवार असे उत्तर देणे त्यांच्या विचारांशी, संभाषणाच्या पद्धतीशी आणि भावनेशी जोडलेले असू शकते.
फक्त ‘ठीक आहे’ म्हणण्याच्या सवयीवरून कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा मानसिक आरोग्याबद्दल खात्रीशीरपणे सांगता येत नाही. पण मानसशास्त्रीय संशोधन काय सांगते? यातलं पहिलं कारणं म्हणजे संघर्षापासून दूर राहणे – काही लोक वाद किंवा संघर्ष टाळण्यासाठी समोरच्या व्यक्तीची गोष्ट ताबडतोब मान्य करतात. त्यांना असे वाटते की स्वतःचे मत मांडल्यामुळे संभाषण लांबेल किंवा वातावरण बिघडू शकते. त्यामुळे ते वाद घालण्यापेक्षा ‘ठीक आहे’ म्हणून विषय संपवणे पसंत करतात. सायकॉलॉजीमध्ये याला ‘कॉन्फ्लिक्ट अवॉइडन्स’ (Conflict Avoidance) म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, संघर्ष टाळण्यासाठी अनेकजण ‘ठीक आहे’ म्हणून जातात, पण याचा अर्थ ते समोरच्या व्यक्तीच्या मताशी पूर्णपणे सहमत असतीलच असे नाही. बऱ्याचदा त्यांना केवळ शांतता टिकवून ठेवायची असते.
यातलं दुसरं कारणं म्हणजे आपल्या भावना मोकळेपणाने न सांगणे – सायकोलॉजिस्ट आन्या बंसल यांच्या मते, काही व्यक्तींसाठी आपला राग, दुःख किंवा असहमती शब्दांत व्यक्त करणे सोपे नसते. त्यांना समोरच्या व्यक्तीला हे सांगता येत नाही की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वाईट वाटले आहे, अशा परिस्थितीत ‘ठीक आहे’ हा त्यांच्यासाठी संभाषण संपवण्याचा सर्वात सोपा मार्ग बनतो. म्हणजेच, शब्द जरी छोटा असला तरी त्यामागे वेगवेगळ्या भावना असू शकतात. नेहमी इतरांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करणे हे देखील याचे एक कारण असू शकते. काही लोक आपल्या आसपासच्या लोकांना नाराज करण्यापासून खूप स्वतःला वाचवतात.
छत्रपती संभाजीनगरात दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; ढाब्यावर कुक, वेटर म्हणून करत होते काम
ते समोरच्या व्यक्तीच्या गरजा आणि भावनांना स्वतःच्या गरजांपेक्षा जास्त महत्त्व देतात. उदाहरणार्थ, मित्राने कुठेतरी फिरायला जाण्याचा निर्णय घेतला आणि व्यक्तीला स्वतः तिथे जायचे नसेल, तरीही तो म्हणतो – ‘ठीक आहे, चल’. हे वर्तन ‘पीपल प्लीजिंग’ शी जोडलेले असू शकते. यातलं तिसरं कारण म्हणजे प्रत्येकाच्या मागे मोठी सायकॉलॉजी नसते – प्रत्येक ‘ठीक आहे’ मागे एखादे मोठे मानसशास्त्र दडलेले असेलच, असे नाही. अनेक लोकांना मोजक्या शब्दांत बोलणे आवडते. त्यांना लांबच लांब संभाषण आवडत नाही आणि ते छोटी उत्तरे देऊन संवाद पुढे नेतात. अशा व्यक्तीसाठी ‘ठीक आहे’ ही केवळ एक साधी प्रतिक्रिया असू शकते. त्यामुळे केवळ एका शब्दावरून किंवा सवयीवरून कोणाच्याही व्यक्तिमत्त्वाची पारख करणे योग्य ठरत नाही.
यातलं चौथं कारण म्हणजे जेव्हा व्यक्ती आतून अस्वस्थ किंवा त्रस्त असते – कधीकधी एखादी व्यक्ती इतकी थकलेली किंवा त्रस्त असते की तिच्यात कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची ऊर्जा उरलेली नसते. अशा वेळी ती ‘ठीक आहे’, ‘हो, चल ठीक आहे’ अशी छोटी उत्तरे देऊ लागते. याचा अर्थ ती समोरच्या व्यक्तीवर रागवली आहेच, असे नाही. कदाचित ती व्यक्ती त्या वेळी संवाद साधण्याच्या मनस्थितीतच नसेल. म्हणूनच, जर एखाद्या जवळच्या व्यक्तीचे उत्तरे अचानक खूप लहान झाली असतील, तर ती व्यक्ती दुर्लक्ष करत आहे असे समजणे चुकीचे ठरेल. तिच्या वागण्यातील इतर बदलांचेही निरीक्षण केले पाहिजे.
आता संशोधन काय सांगते? ते पाहूयात – संभाषण आणि मानसोपचार यांसारख्या विषयांवर झालेली संशोधने असे सांगतात की, माणूस संभाषणात केवळ शब्दांद्वारेच आपल्या भावना व्यक्त करत नाही. बोलण्याची पद्धत, आवाजातील उतार-चढव, संभाषणाचा संदर्भ, वेळ आणि बोलण्याची संपूर्ण शैली देखील अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या व्यक्तीचे छोटे किंवा संदिग्ध उत्तर येण्यामागचा अर्थ परिस्थितीनुसार वेगवेगळा असू शकतो. ‘ठीक आहे’ म्हणणे म्हणजे सहमती दर्शवणे, संभाषण संपवणे, एखादी गोष्ट स्वीकारणे किंवा फक्त समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतल्याचे संकेत असू शकतात.
रायगडच्या पालकमंत्रिपदी अखेर गोगावले; शिंदेंच्या शिलेदाराने तटकरेंना शह दिला की राजकीय डील ?
त्याचप्रमाणे, लोकांच्या वर्तनावर केलेल्या मानसशास्त्रीय संशोधनानुसार, काही लोक सामाजिक वाद टाळण्यासाठी आपली खरी आवड आणि असहमती उघडपणे समोर आणत नाहीत. असे लोक अनेकदा स्वतःचे मत मांडण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे मान्य करतात, जेणेकरून वाद होणार नाही किंवा कोणाला वाईट वाटणार नाही. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असे घडेलच, असे नाही.
निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी योग्य दृष्टिकोन बाळगा – म्हणूनच, केवळ संशोधनांच्या आधारावर असे म्हणणे चुकीचे ठरेल की जे लोक प्रत्येक गोष्टीवर ‘ठीक आहे’ म्हणतात, ते आतून दुःखी असतात किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व कमकुवत असते. असे विधान करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचे अतिशय साधेसुधे व चुकीचे विश्लेषण करण्यासारखे होईल. यासाठी केवळ त्याच्या शब्दांवर लक्ष केंद्रित न करता त्याच्या इतर वर्तनाचेही निरीक्षण करणे आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती आधी मोकळेपणाने बोलत असेल, पण आता सतत लहान उत्तरे देत असेल, संभाषणापासून दूर जात असेल, लवकर चिडत असेल किंवा आपल्या भावना शेअर करत नसेल, तर तिच्याशी शांतपणे चर्चा करणे अधिक फायदेशीर ठरते.
तुम्ही त्याला थेट विचारू शकता – तू खरोखर ठीक आहेस की फक्त विषय संपवण्यासाठी ‘ठीक आहे’ म्हणतोयस? बऱ्याचदा असा प्रश्न समोरच्या व्यक्तीला आपल्या खऱ्या भावना व्यक्त करण्याची संधी देतो. कदाचित ती व्यक्ती एखाद्या समस्येमुळे त्रस्त असेल, पण स्वतःहून ती गोष्ट सांगण्यास सुरुवात करू शकत नसेल. प्रत्येक वेळी ‘ठीक आहे’ म्हणणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाला समजून घेण्यासाठी त्याच्या संपूर्ण संभाषणाकडे आणि सवयींकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. ही सवय कधी शांतता आवडण्यामागे, कधी वाद टाळण्याच्या प्रयत्नात, कधी इतरांना खूश ठेवण्याच्या स्वभावात तर कधी मोजके बोलण्याच्या सवयीशी जोडलेली असू शकते.
