WhatsApp Document Scanning Feature : व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी काहींना काही नवीन फीचर आणत असते. ज्यामुळे युजर्सला व्हॉट्सॲप (WhatsApp Document Scanning Feature) सहज वापरता येतो. तर आता पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग कंपनी व्हॉट्सॲप (WhatsApp) आणखी एक नवीन फीचर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सला व्हॉट्सॲपवर कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय डॉक्युमेंट स्कॅन करता येणार आहे. तसेच स्कॅन डॉक्युमेंट पीडीएफच्या मदतीने व्हॉट्सॲपवर शेअर करता येणार आहे. सध्या कंपनी या नवीन फीचरवर काम करत असून लवकरच युजर्ससाठी फीचर लॉन्च करण्यात येणार आहे.
व्हॉट्सॲपचा नवीन फीचर डॉक्युमेंट (Document) शेअरिंग मेनूमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे युजर्स त्यांच्या फोनचा कॅमेरा वापरुन कोणतेही डॉक्युमेंट स्कॅन करुन चेटच्या मदतीने शेअर करु शकणार आहे. माहितीनुसार, नवीन फीचर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मोडमध्ये काम करणार आहे. मॅन्यूअल फीचरमध्ये युजर्सला स्वत:डॉक्युमेंट स्कॅन करता येणार आहे. तर ऑटोमॅटिक मोडमध्ये ऑटोमॅटिक युजरसाठी डॉक्युमेंट स्कॅन करुन देणार.
शेअरिंग सहज करता येणार
डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर तुम्ही स्कॅन डॉक्युमेंटला पीडीएफमध्ये रुपांतर करुन त्याला चॅटच्या मदतीने सहज कोणासोबत देखील शेअर करु शकतात. तर दुसरीकडे या नवीन फीचरमध्ये कंपनीने युजर्सच्या सेफ्टीचा विचार करत स्कॅन डॉक्युमेंट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार असल्याची माहिती दिली आहे. ज्यामुळे तुमची खाजगी माहिती सुरक्षित राहणार आहे.
इराणशी युद्धात इस्रायलला एका दिवसाचा खर्च किती? जाणून व्हाल थक्क
एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मुळे तुम्ही आणि मसेजेच प्राप्तकर्ताच स्कॅन केलेल्या फाइलमध्ये प्रवेश करु शकाल. माहितीनुसार सध्या या जबरदस्त नवीन फीचरवर काम सुरु असून युजर्ससाठी पुढील काही दिवसात रोल करण्यात येणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्सला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय डॉक्युमेंट स्कॅन करता येणार आहे.