Download App

WhatsApp करणार धमाका, ‘हे’ 3 नवीन फीचर्स बदलणार व्हॉइस अन् व्हिडिओ कॉलिंगची मज्जा

WhatsApp Upcoming Feature : केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोकप्रिय मेसेजिंग साईट व्हॉट्सॲप (WhatsApp) पुन्हा एकदा मोठा

  • Written By: Last Updated:

WhatsApp Upcoming Feature : केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोकप्रिय मेसेजिंग साईट व्हॉट्सॲप (WhatsApp) पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. माहितीनुसार, लवकरच व्हॉट्सॲप तीन नवीन फीचर्स लॉन्च करणार आहे. ज्यामुळे यूजर्सला मोठा फायदा होणार आहे. व्हॉट्सॲप व्हाइस (Voice Calling) आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी (Video Calling) नवीन फीचर्स लॉन्च करत आहे.

नवीन फीचर्स कोणती ?

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या व्हॉट्सॲप बीटा व्हर्जनच्या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये नवीन फीचर्स उपलब्ध करण्यात येत आहे. माहितीनुसार नवीन तिन्ही फीचर्स सध्या बीटा युजर्ससाठी आहे.

म्यूट बटण

WABetaInfo ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्सॲप एक म्यूट बटण फीचर आणणार आहे. याचा फायदा घेत यूजर्स इनकमिंग व्हॉइस कॉल नोटिफिकेशन्स सायलेंट करु शकतात. म्हणजेच आता यूजर्स कॉल घेताना त्यांचा मायक्रोफोन म्यूट ठेवू शकतील. तसेच म्यूच फीचर तुम्हाला अनावश्यक कॉल ब्लॉक करण्याची देखील परवानगी देणार आहे. जर तुम्हाला कोणाचा व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल उचलायचा नसेल, तर हे फीचर खूप फायदेशीर ठरु शकते.

कॅमेरा फीचर

म्यूट बटण फीचरसह व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलसाठी देखील एक नवीन फीचर आणणार आहे. WABetaInfo नुसार या नवीन फीचरचा फायदा घेत यूजर्स व्हिडिओ कॉल घेण्यापूर्वी कॅमेरा बंद करू शकतील. यापूर्वी कॉल आल्यानंतर कॅमेरा बंद करावा लागत होता मात्र आता असं होणार नाही.

महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच पक्षाचा संकल्प, भाजपा स्थापना दिनी CM फडणवीसांची ग्वाही

इमोजी फीचर

तर दुसरीकडे व्हॉट्सॲप इमोजी फीचर देखील लॉच करणार आहे. या फीचरचा फायदा घेत यूजर्स व्हिडिओ कॉल दरम्यान इमोजीने रीॲक्ट करु शकतात. हे तिन्ही फीचर व्हॉट्सॲप लवकरच लॉन्च करणार असल्याची माहिती देखील WABetaInfo ने आपल्या वृत्तात दिली आहे.

follow us