Download App

थंडीत झटपट एनर्जीसाठी प्या गुळाचं पाणी, जाणून घ्या विविध फायदे

मुंबई : हिवाळ्यामध्ये गूळ खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुळात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, गूळ इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास देखील मदत करते. त्यात कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि तांबे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हिवाळ्यात गूळ खाण्याचा आणखी एक अतिशय आरोग्यदायी मार्ग म्हणजे ते गरम पाण्यात मिक्स करणे. हिवाळ्यात सकाळी कोमट पाण्यात गूळ टाकून पिल्याने झटपट एनर्जी मिळते. जाणून घ्या त्याचे फायदे.

एका भांड्यात एक ग्लास पाणी गरम करून त्यात एक इंच गुळाचा तुकडा घाला. ते चांगले मिक्स करा. ते वितळल्यावर थोडसं थंड झाल्यावर गाळून प्यावं. गूळ बारीक करून ग्लासात कोमट पाण्यात मिक्स करता येईल.

जाणून घ्या गूळ पाण्याचे फायदे :

हाडांसाठी लाभदायक
हाडांच्या मजबुतीसाठी गूळ खूप फायदेशीर आहे. ज्यांना सांधेदुखीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी गूळ लाभदायक ठरू शकतो. गरम पाण्यात गूळ मिक्स करुन पिल्यानं रक्तदाब संतुलित राहते.

लोहाची कमी भरते
हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी गरम पाण्यात गूळ टाकून प्यावं. त्यात भरपूर लोह आणि फोलेट असते.

शरीर डिटॉक्स होते
गूळ शरीराला डिटॉक्सिफाय करतो, रक्त शुद्ध करते, लिव्हर शुद्ध करते. गूळ गरम पाण्यात टाकून पिल्यानं त्वचा चमकदार होते.

इलेक्ट्रोलाइट संतुलन
शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास गूळ मदत करतो. वॉटर रिटेंशन कमी होऊन वजन कमी होते.

इम्युनिटी बूस्टर
गूळामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 1, बी 6, आणि सीचे प्रमाण अधिक असते. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स अधिक प्रमाणात असतात.

Tags

follow us