Download App

World Water Day : एक लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात लाखो डॉलर, काय आहे याच कारण?

  • Written By: Last Updated:

World Water Day 2023 : असं म्हटलं जातं पृथ्वीवरील जवळपास १/३ भाग पाण्याने व्यापला आहे. असे असले तरीही जगातील मोठी लोकसंख्या पाण्यापासून वंचित आहे. जगात इतकी मोठी वैज्ञानिक प्रगती झाली असली तरी पाणीटंचाईचा सामना आजही करावा लागत आहे.

एका रिपोर्टनुसार पृथ्वीवरील 100 लोकांपैकी 25 लोकांना अजूनही नदी, तलावातून पाणी आणावे लागते. पण त्याच वेळी जगातील एका भागात पॅकबंद पाण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. हे पाहिलं तर तुम्हाला आजचा जागतिक पाणी का महत्वाचा हे तुम्हाला समजेल.

हवामानाचा मूड आजही बदलणार? हवामान विभागाने सांगितलं…

जगातील सर्वात महाग पाणी ब्रँड

Beverly Hills 9OH2O Luxy Collection Diamond Edition

हा पाणी ब्रँड एका लक्झरी ज्वेलर्सने सादर केलेला सर्वात महागडा पाणी ब्रँड आहे. कॅलिफोर्नियातील नैसर्गिक झऱ्यांमधून हे पाणी गोळा करण्यात येत. याच्या किमतीमागचं आणखी एक कारण म्हणजे त्याची बाटली. बेव्हरली हिल्स ज्वेलर्सने सुमारे 850 लहान हिऱ्यांसह त्याची बाटली तयार केली. या पाण्याची किंमत दोन लाख अमेरिकन डॉलर प्रति लिटर ठरवण्यात आली होती. बेव्हरली हिल्स 90H20 लक्झरी कलेक्शन डायमंड एडिशन वॉटर फारसे चालले नाही. 2017 नंतर कंपनीला कोणतीही ऑफर आली नाही.

Acqua di Cristallo Tributo a Modigliani

फिजी, फ्रान्स किंवा आइसलँडिक ग्लेशियरमधील झऱ्यांमधून जमा केलेल्या या पाण्याची किंमत प्रति लीटर सुमारे $60,000 आहे. कारण त्याची बाटली 24 कॅरेट सोन्याने मढवलेली आहे. 2010 मध्ये लिलावात विकले गेल्याने हा ब्रँड आता बाजारात उपलब्ध नाही.

तेलंगणासह गडचिरोली, चंद्रपुरातही भूकंपाचे सौम्य धक्के…

Fillico Jewelry Water

फिलिको ज्वेलरी वॉटर हे जपानमधील कोबे येथील उच्च दर्जाच्या नैसर्गिक खनिजांच्या झऱ्यांमधून जमा केलेले पाणी आहे. पॅकेजिंगमुळे हे पाणी विशेष आहे. जपानी कारागिरी याला अद्वितीय बनवते. या पाण्याची बाटली स्वारोवस्की क्रिस्टल्सने सजवलेल्या असतात. रॉयल लुक देणाऱ्या या बाटल्या भेटवस्तू म्हणून वापरल्या जातात. एक लिटर फिलिको पाण्याची किंमत $1,390 पर्यंत आहे.

Nevas

जर्मनीतील दोन विशेष आर्टिशियन विहिरींमधून जमा केलेल्या पाण्यापासून नेव्हास ब्रँडचे पाणी बनवले जाते. या पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. असे मानले जाते की ते शंभर वर्षे जुने आहे. पाण्याच्या बाटल्या फॅन्सी डिझाइनसह लक्झरी शॅम्पेनच्या बाटल्यांसारख्या दिसतात. नेव्हासची किंमत सुमारे $1,042 प्रति लिटर आहे.

 

Tags

follow us