मुंबई : तुम्हाला माहिती आहे का? की, आजच्याच दिवशी 3 एप्रिल 1973 ला म्हणजे 50 वर्षांपूर्वी जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ (Mobile Phone Call) करण्यात आला होता. अमेरिकन इंजिनिअर मार्टिन कूपर (Martin Cooper) ज्यांना हॅंडहेल्ड सेल फोनचे जनक मानले जाते. त्यांनी हा जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ केला होता. ते त्यावेळी अमेरिकेतील मोटोरोला (Motorola) या कंपनीमध्ये इंजिनिअर होते. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या कंपनीतील व्यक्तीला हो कॉल केला होता. त्यांनी समोरच्या व्यक्तीला सांगितले की, मी हॅंडहेल्ड सेल फोनवरून हा कॉल केला आहे.
त्यामुळे 3 एप्रिल हा दिवस मोबाईल फोनच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. ज्या मोबाईल फोनवरून जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ करण्यात आला होता. त्याला मोटोरोला डायनाटॅक (Motorola Dynatac) असं नाव देण्यात आलं. जो मोटोरोलाचा पहिला प्रोटोटाईप आधारित कमर्शियल फोन होता.
Elon Musk यांचा असाही जलवा; ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे व्यक्ती
आता जरी वजनाने हलके आणि पातळ असलेले स्मार्ट फोन्स आपण वापरत असलो. तरी ज्या मोबाईल फोनवरून जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ करण्यात आला होता. तो फोन 1.1 किलोग्राम वजनाचा होता. त्याची जाडी 13 सेंटीमीटर आणि लांबी 4.45 सेंटीमीटर होती. एखाद्या विटेप्रमाणे हा फोन होता. यामध्ये एक एलईडी डिस्प्ले देखील होती.
आजकल स्मार्टफोन्स एकदा चार्ज केले की, 2 दिवसांपर्यंत ही चार्जिंग टिकते. पण ज्या मोबाईल फोनवरून जगातील पहिला ‘मोबाईल फोन कॉल’ करण्यात आला होता. त्याला चार्ज होण्यासाठी 10 तास लागायचे. एवढा वेळ चार्जिंग करून देखील या फोनची चार्जिंग 30 मिनटांपर्यंतच चालायची. तसेच या फोनची बॅटरी आजच्या फोन्सच्या तुलनेत 4 ते 5 पटींनी जड होती.