भारतीयांसाठी एक आनंदाची बाब आहे. भारतीय वंशाचे नील मोहन हे आता यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ असणार आहेत. यूट्यूबचे सध्याचे सीईओ सुसान व्होजिकी यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यानंतर नील मोहन यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. यूट्यूबचीच मुळ कंपनी अल्फाबेट इंक या कंपनीने 16 फेब्रुवारी रोजी याबाबतची घोषणा केली आहे.
नील मोहन हे 2015 साली यूट्यूबमध्ये रुजू झाले होते. आता त्यांच्याकडे यूट्यूबच्या सीईओ पदासह यूट्यूबचे सीनिअर व्हाइस प्रेसिडंट पद देखील असणार आहेत. याआधी नील मोहन हे यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर होते. नील हे येणाऱ्या काळात यूट्यूबचे नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचे, अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान सुसान व्होजिकी यांनी आपल्या वैयक्तीक कारणांमुळे आपला राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यांना आपले कुटूंब, आरोग्य व काही वैयक्तीक गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. यूट्यूबच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र पाठवत त्यांनी ही माहिती दिली आहे. यूट्यूब हा एक व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील करोडो लोक यूट्यूब पाहत असतात.