Download App

गौतम अदानींच्या संपत्तीतील वाढ पाहून तुम्ही व्हाल शॉक, पहा नेमकं काय घडलं

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत कमालीची घट झाली होती. तसेच अदानी समूहाच्या अनेक शेअर्समध्ये मोठी पडझड देखील झाली. मात्र आता पुन्हा एकदा अदानी यांनी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत (Gautam Adani Net worth) पुन्हा एकदा वाढ झाल्याची नोंद झाली आहे. तसेच त्यांचे शेअर्स देखील पुन्हा एकदा तेजीत आले आहे. दरम्यान अदानी यांच्या संपत्तीत अवघ्या तीन आठवड्यात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे अदानी समूहातील गुंतवणूकदार काहीसे सुखावले आहे.

हिंडेनबर्ग अहवाल
गेल्या काही महिन्यांपूर्वी हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण होऊ लागली होती. हिंडेनबर्ग यांनी अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले ज्याचा परिणाम थेट अदानी समूहाच्या शेअर्सवर झाला.

शेअर्समध्ये कमालीची घसरण
या अहवालामुळे अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती 80 टक्क्यांपर्यंत घसरल्या. अदानी समूहातील 10 सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप तब्बल 12.06 लाख रुपयांनी घटले. यामुळे उद्योगपती अदानी यांची संपत्ती 40 बिलियन डॉलर्स पेक्षा कमी झाली. विशेष म्हणजे अदानी यांनी अवघ्या एका महिन्यात 80 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान सहन केले.

आता केस गळणे थांबेल, जाणून घ्या उपाय

मात्र आता पुन्हा एकदा अदानी यांच्या शेअर्सने घसरणीकडून तेजीकडे वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान
गौतम अदानी यांची गणना यापूर्वी जगातील टॉप 3 श्रीमंतांमध्ये केली जात होती. त्यांनी थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk Networth) व Amazon चे जेफ बेझोस (Jeff Bezos Networth) यांच्याजवळपास झेप घेतली होती.

आता केस गळणे थांबेल, जाणून घ्या उपाय

संपत्तीत 50 टक्क्यांहून अधिकची वाढ
मात्र अवघ्या एका हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी यांची संपत्तीमध्ये मोठी घट झाली होती. मात्र आता अदानी यांच्या संपत्तीत (Gautam Adani Net worth) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शेअरच्या वाढत्या दरामुळे अदानी यांच्या संपत्तीत 50 टक्क्यांहून अधिकची वाढ झाल्याचे आकडेवारी समोर आली आहे. ते जगभरातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीमध्ये दाखल होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत.

Tags

follow us