Download App

झिम्बाब्वे सर्वात दु:खी देश; जाणून घ्या भारताचा क्रमांक

Most Miserable Country in the World : प्रसिद्ध अर्थतज्ञ स्टीव्ह हँके (Economist Steve Hanke) यांनी 2023 मधील जगातील सर्वात दु:खी देशांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या वार्षिक दुःख निर्देशांकानुसार झिम्बाब्वे जगातील सर्वात दु:खी देश ठरला आहे. 157 देशांचा अभ्यास करुन हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. झिम्बाब्वेने युक्रेन, सीरिया आणि सुदान सारख्या युद्धग्रस्त देशांना या यादीत मागे टाकले आहे.

सर्वात दु:खी देश
वाढती महागाई, बेरोजगारी, कर्जाचे दर आणि खराब अर्थव्यवस्था यामुळे झिम्बाब्वेची परिस्थिती बिकट झाली आहे. झिम्बाब्वेच्या या परिस्थितीसाठी देशातील सत्ताधारी राजकीय पक्ष झानू-पीएफ आणि त्यांच्या धोरणांना जबाबदार धरण्यात आले आहे. व्हेनेझुएला, सीरिया, लेबनॉन, सुदान, अर्जेंटिना, येमेन, युक्रेन, क्युबा, तुर्की, श्रीलंका, हैती, अंगोला, टोंगा आणि घाना हे सर्वात दु:खी देशांच्या यादीतील 15 देश आहेत.

BCCI चा प्लेऑफसाठी नवा उपक्रम, डॉट बॉल टाकल्यास… करावे लागणार ‘हे’ काम

सर्वात आनंदी देश
अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हँके यांच्या अहवालानुसार, स्वित्झर्लंडला सर्वात कमी गुण मिळाले आहेत, याचा अर्थ तेथील नागरिक सर्वात आनंदी आहेत. या अहवालानुसार दुसऱ्या क्रमांकाचा आनंदी देश म्हणजे कुवेत, त्यानंतर आयर्लंड, जपान, मलेशिया, तैवान, नायजर, थायलंड, टोगो आणि माल्टा यांचा क्रमांक लागतो.

भारत कोणत्या क्रमांकावर?
या यादीत भारत 103 व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, सध्या भारतात बेरोजगारी वाढत आहे. या यादीत अमेरिका 134 व्या स्थानावर आहे. वार्षिक दुःखाचा निर्देशांक प्रामुख्याने जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील अप्लाइड इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक स्टीव्ह हँके यांनी संकलित केला आहे.

Sengol History : चोल साम्राज्याशी संबंधित सेंगोल कसे बनले भारतीय सत्तेचे प्रतीक?

हा निर्देशांक मोजण्यासाठी बेरोजगारी, महागाई आणि बँकांच्या कर्जाचे दर हे निकष लावले आहेत. हा अहवाल दरवर्षी सादर केला जातो. अहवालात 157 देशांचे विश्लेषण करण्यात आले. या आधारे झिम्बाब्वे सर्वात दु:खी असलेल्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारत 103 व्या स्थानावर आहे.

Tags

follow us