Download App

लोकसभेला आय लव्ह यू, विधानसभेला आय हेट यू, गुलाबरावांची फटकेबाजी

लोकसभा निवडणुकीवेळी सगळेच आय लव्ह यू म्हणत असतात, शत्रूही मित्र होतात. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी आय हेट यू सुरू होते.

Gulabrao Patil : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आता एका प्रचारसभेत बोलतांना शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेलं विधान चर्चेत आलंय. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सगळेच आय लव्ह यू म्हणत असतात, दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है. पण विधानसभेच्या निवडणुकीवेळी मात्र सगळे एकमेकांच्या विरोधात असतात, आय हेट यू म्हणतात, असं वक्तव्य करत गुलाबराव पाटलांनीदखद व्यक्त केली.

चंद्रकांत पाटलांच्या विधानावर अजितदादा नाराज; म्हणाले, बोलणं चुकीचच.., 

जळगावमध्ये भाजप उमेदवार स्मिता वा यांच्या प्रचारार्थ महायुतीची जाहीर सभा झाला. महायुतीच्या या सभेत बोलतांना गुलाबराव पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सगळे एकमेकांच्या विरोधात असतात, पण लोकसभा निवडणुकीत दुश्मन के दुश्मन भी दोस्त हो जाते. आजच्या मंचावरच बघा- अमळनेरमध्ये शिरीष चौधरी आणि अनिल पाटील यांच्यात आय लव्ह यू आहे, तिकडे पाचोरा तालुक्यात किशोर पाटील आणि भाजपचे अमोल शिंदे यांच्यात आय लव्ह यू. धरणगावमध्ये गुलाबराव पाटील आणि भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात आय लव्ह यू. खासदारकीच्या वेळी आय लव्ह यू चालू असते. मात्र, विधानसभेच्या निवडणुका आल्या की आय हेट यू होऊन जाते, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

भुजबळ तुतारीच्या प्रचारात, शिंदेंच्या आमदाराचा आरोप; राजीनाम्याची केली मागणी 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, ही गटार, वॉरट, मीटरची निवडणूक नाही. ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. ही देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असल्यामुळं आमची तोंड एरवी जरी वाकडी असली तरी देशाच्या नेतृत्वाकरिता आम्ही एकत्र येऊन देशाचं नेतृत्व ठरवतो, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, लोकसभाला सगळेच आय लव्ह यू म्हणतात, पण विधानसभेच्या निवडणुकीवेळी मात्र सगळे एकमेकांच्या विरोधात असतात, असं वक्तव्य केल्यानं गुलाबराव पाटलांचा नेमका रोख कुणाकडे होता, याची चर्चा सुरू झालीये.

follow us