Download App

Video : भाजपचं बहुमत गाठेल सांगणारे एक्सिस माय इंडियाचे MD लाईव्ह शोमध्ये ढसाढसा रडले

दोन महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात बिगूल वाजलेल्या लोकसभा निवडणुकांची सांगता अखेर काल (दि.4) अंतिम निकालाने पूर्ण झाली.

  • Written By: Last Updated:

Why Axis My India MD Crying In Live Press Conference : दोन महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात बिगूल वाजलेल्या लोकसभा निवडणुकांची सांगता अखेर काल (दि.4) अंतिम निकालाने पूर्ण झाली. निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून ते निवडणूक पूर्व अंदाज बांधण्यापर्यंत देशात पुन्हा एकहाती मोदी सरकार येणार हे स्वतः भाजप आणि अनेक एक्झिट पोल सांगणाऱ्या संस्था सांगत होत्या. पण प्रत्यक्षात समोर आलेला निकाल काही प्रमाणात भाजपला आणि त्यांना निकालपूर्व अंदाजात एकहाती सत्ता देणाऱ्या एक्झिट पोलच्या संस्थांना जोरदार धक्का देणारा ठरला. हा धक्का सहन न झाल्याने एक्सिस माय इंडियाचे MD प्रदीप गुप्ता एका वृत्तवाहिनीच्या भर लाईव्ह कार्यक्रमात अक्षरक्षः ढसाढसा रडले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; राज्यातील पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी घेतली !

Axis My India चा अंदाज काय होता?

‘ॲक्सिस माय इंडिया’च्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 361-401 जागा मिळतील असा मोठा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर, मोदी विरोधात एकत्रित मोट बांधणाऱ्या इंडिया आघाडीला 131 ते 166 जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज गुप्तांच्या Axis My India ने वर्तवला होता. परंतु, निवडणुकीचे निकाल आले तेव्हा चित्र पूर्णपणे उलट होते. ही उलटफेर झाल्याने भाजपचे तिसऱ्यांदा स्वबळावर बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पूर्णतः फेल ठरले आहे. त्यात गुप्ता यांच्या संस्थेने भाजपला तीनशेहून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज निकालादिवशी साफ चुकला आणि तो बघताना गुप्ता यांना भावना अनावर झाल्या आणि ते कॅमेरासमोरच घायमोकलून रडायला लागले.

शो दरम्यान नेमकं काय झालं?

लोकसभा निवडणुकीच्या निकालात एक्झिट पोल पूर्णपणे अपयशी ठरले आहेत हे आता अधोरेखित झाले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलने भाजपला 350 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु, प्रत्यक्ष निकालात भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. एक्झिट पोलिंग एजन्सी ॲक्सिस माय इंडियाने भाजपला 400 हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात तसे न होता भाजपची गाडी 240 जागांवरच अडकली. त्यावेळी एक्झिट पोलमध्ये कुठे चूक झाली हे सांगत त्यांनी माफीदेखील मागितली आणि अचानक त्यांना लाइव्ह शोमध्ये आश्रू अनावर झाले.

फडणवीसांचं गणित चुकलं; नाना पटोलेंचा डाव यशस्वी, शरद पवारांचा प्रभाव कायम

गुप्तांच्या रडारवर होते राहुल गांधी

निकालाच्या एक दिवस आधी प्रदीप गुप्तांनी आमचे 69 पैकी 65 एक्झिट पोल बरोबर असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या दाव्याचा राहुल गांधींनीही समाचार घेतला होता. मात्र, त्यापूर्वी प्रदीप गुप्तांनी राहुल गांधींवर विधान करताना राहुल गांधी किंवा काँग्रेसने केवळ इंडिया आघाडीसाठी निवडणूक लढवल्याचे म्हटले होते. तसेच राहुल गांधी हे ब्रँड म्हणून दिसत नाही, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तेथे काँग्रेसचे मतदार राहुल गांधींच्या नावाने नव्हे तर, तेथे काँग्रेस सरकारने दिलेल्या सुविधा आणि व्यवस्थेच्या आधारे मतदान करतात असाही दावा केला होता.

Ajit Pawar : ‘धाकल्या’ पवारांची झाकली मूठ सव्वा लाखाची अखेर उघडी

महाराष्ट्रासह कुठे कुठे गुप्तांचा अंदाज चुकला?

गुप्ता यांच्या संस्थेने वर्तवलेला अंदाज फक्त भाजपबाबतच चुकला असे नाही तर, महाराष्ट्रासह अन्य प्रमुख राज्यांमध्येही चुकला आहे. गुप्ता यांच्या अॅक्सिम माय इंडियाने महाराष्ट्रात एनडीएला 28 ते 30 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. पण या ठिकाणीही त्यांचा अंदाज साफ चुकला आणि भाजपला येथे केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. येथे एनडीएला साधारण 8 ते 10 जागांचे नुकसान झाले आहे.

follow us