Download App

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळेच आयपीएस अधिकारी देवेन भारतींची नियुक्ती?

मुंबई : पोलीस दलाच्या इतिहासात मोठी घटना आज राज्यात घडली आहे. अती प्रतिष्ठित अशा मुंबई पोलीस आयुक्त या पदाच्या समकक्ष असलेल्या “विशेष पोलिस आयुक्त” हे पद निर्माण करण्यात आलं आहे. पोलीस सह आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यावर अधिक चांगलं नियंत्रण ठेवता, यावे यासाठी हे पद निर्माण केल्याचं शासनाने म्हटलं आहे, तर पोलीस दलात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं आरोप विरोधकांनी केला आहे.

राज्य सरकारने आज विशेष पोलिस आयुक्त हे पद निर्माण केलं आहे, या पदावर वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांचं पद हे मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या नियंत्रणात असल्याचं सरकारच म्हणणं आहे. पण सर्व पोलीस सह आयुक्त हे विशेष पोलिस आयुक्तांना रिपोर्टींग करतील, असे आदेशात स्पष्ट दिसत आहे. जर सर्व अधिकारी आयुक्तांना रिपोर्टिंग करत असताना हे पद का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

यावरून पोलिस दलात दोन गत निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वीज कंपन्यांमध्ये पदनिर्मिती करताना या कायद्याचा आधार घेत तीन कंपन्याच विभागणी करण्यात आली होती. तोच आधार विशेष पोलिस आयुक्त पद निर्माण करताना घेण्यात आला असल्याचे राज्य सरकारने सांगितलं. राज्यात गेले काही दिवस देवेन भारती हे कुठल्याही पदावर नव्हते, भाजपला मदत करण्याच्या एक मतप्रवाहामुळे देवेन भारती यांना पोस्टिंग देण्यात आली नव्हती अशी चर्चा होती, आता देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यामुळे देवेन भारती यांच्यासाठी पद निर्माण करण्यात आल्याचा आरोप होतोय.

देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त पदप्रमाने आपल्या व्यक्तीची पोलीस आयुक्त दर्जावर आणून ठेवले , यामुळे पोलीस दलात दोन सत्ताकेंद्र उभे राहतील असा आरोप काँग्रेस चे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. आज हे पद निर्माण केल्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर एक मेकानाच्या करतात अधिकारी हस्तक्षेप करतात का? अधिकारी यांचं गट तट चे राजकारण सुरू होते का? हे प्रत्यक्ष कामकाज नंतर समोर येईल हे नक्की
.
प्रफुल्ल साळुंखे
विशेष प्रतिनिधी

Tags

follow us